इस्रोकडून विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, मोफत मिळणार 'हे' शिक्षण..

 इस्रोकडून विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, मोफत मिळणार 'हे' शिक्षण..




----------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------
 आंतराष्ट्रीय स्तरावर आपलं नाव उंचावणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) आता देशभरातील होतकरू शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकण्याची संधी प्राप्त झाली आहे. यात NCERT च्या अभ्यासक्रमानुसार, रिमोट सेंसिंग तंत्रज्ञानाच्या मूलभूत गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना इस्रोकडून मोफत ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 

 इस्रोकडून इयत्ता 8वी पर्यंतच्या ज्या विद्यार्थ्यांना रिमोट सेंसिंग, जिओ इंफोर्मेशन सायन्स शिकायचं असेल आणि यासाठी विज्ञान गणिताची मुलभूत माहिती असणारे विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकणार आहेत. शालेय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना माहितीपूर्ण व्याख्यानांच्या माध्यमातून रिमोट सेंसिग तंत्रज्ञान आणि पृथ्वी आणि त्याच्या पर्यावरणाच्या अभ्यासाठी त्याचा वापर याची माहिती देणे हे या अभ्यासक्रमाचे उद्दीष्ट आहे.

 इस्रोच्या स्पेस क्युरिऑसिटी उपक्रमाचा एक भाग म्हणून हा अभ्यासक्रम दिला जातो. यासाठी इस्रोच्या विविध केंद्रातील शास्रज्ञ आणि प्राध्यापक शिकविण्यासाठी वर्ग घेणार आहेत. विद्यार्थ्यांना सहज समजेल अशी सोपी भाषा, चित्र आणि ॲनिमेशनचा वापर या अभ्यासक्रमात केला जाणार आहे. यात रिमोट सेंसिग, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन (EMR) जिओ स्टेशनरी आणि सुर्य-समकालिका उपग्रह रिमोट सेंसरचे प्रकार आणि मल्टिस्पेक्ट्रल स्कॅनर अशा विषयांचा समावेश असेल. 

 तर या अभ्यासक्रमासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याासाठी jigyasa.iirs.gov.in/login या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. तिथे विचारलेली आवश्यक माहिती भरणे गरजेचे आहे. यात विद्यार्थ्यांना वैयक्तीक माहितीबरोबर शाळेची माहिती देखील द्यावी लागणार आहे. यात तुमची निवड झाल्यावर अभ्यासक्रम सुरु होण्याची तारीख आणि अभ्यासक्रम तुम्हाला ई-मेलद्वारे सांगण्यात येईल.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.