जयसिंगपूर येथील चौधरी हॉस्पिटल मध्ये उपचाराच्या नावाखाली हाजोरो रुपयांची लूट.
जयसिंगपूर येथील चौधरी हॉस्पिटल मध्ये उपचाराच्या नावाखाली हाजोरो रुपयांची लूट.
-------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
जयसिंगपुर/प्रतिनिधी
राहुल कांबळे
-------------------------------------
डॉक्टर म्हणजे देवाचे मानले जाणारे दुसरे रूप पण हल्ली या देवाच्या रूपाने कोण सावकार जन्म घेत असलेले दिसत आहेत.
जयसिंगपूर मधील गल्ली नंबर अकरा येथे लहान मुलांच्या उपचार करण्याकरिता चौधरी हॉस्पिटल आहे पण त्या दवाखान्यात लहान मुलांचे उपचार करण्या ऐवजी त्यांच्याकडून पैसे कसे उकळता येईल आणि आपली खळगी कशी भरेल याचाच विचार केला जात असल्याची चर्चा सध्या जयसिंगपूर आणि आजूबाजच्या गावामध्ये जोरात धुमाकूळ घालत आहे. मेडिकल असोसिएशन जयसिंगपूर व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांनी महाराष्ट्र मधील प्रत्येक दवाखान्यांमध्ये एक दर फलक लावण्याकरिता कल्पना देण्यात आले होते जेणे करून दवाखान्यात येण्यापूर्वी प्रत्येक रुग्णाच्या नातेवाइकांना पैशाची मांडणी करता यावी तसेच रुग्ण दवाखान्यात उपचार घेण्यापूर्वी किव्हा रुग्ण दवाखान्यात दाखल करण्यापूर्वी सदर रुग्णाच्या नातेवाइकांना बिलाची पूर्व कल्पना देवून दाखल करण्यात यावे. पण चौधरी हॉस्पिटल मध्ये मात्र दर फलक हे छुप्या पद्धतीनं लावून रुग्णाच्या नातेवकांकडून केवळ मोकळ्या कागदांवर सह्या करून घेतल्या जातात.जेणे करून रुग्ण आपल्याकडून कुठे बाहेर जाता कामा नये.
जयसिंगपूर मधील चौधरी हॉस्पिटल चे डॉक्टर डॉ.स्मिता चौधरी यांनी संभाषनामध्ये एक वेगळं कौशल्य प्राप्त केले आहे कोणी एखाद्या रुग्णाचे नातेवाईक भेटायला किंव्हा बिलासंदर्भात विचारणा करण्यास गेले की रुग्णाचे नातेवाईक बिल कमी करण्या ऐवजी दवाखान्याचे बिल जे देण्यात आले आहे ते सगळं बिल भरून आपले खिसे रिकामे करून परतलेला दिसतो मग निमक डॉ.स्मिता चौधरी रुग्णाच्या नातेवाइकांना कोणती शिकवणी दिली जाते हे समजायला काय कारण नाही.
लहान मुलाच्या आरोग्याची काळजी हे प्रत्येकाला असते पण काही डॉक्टर्स या लहान मुलांच्या आजाराचा आणि त्यांच्या पालकांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन केवळ आणि केवळ फक्त पैसे उकळण्याचा धंदा मांडून बसलेले आहेत.अश्या या पैश्यासाठी साठी लालची असणाऱ्या डॉक्टर्स यांच्यावर्ती कुठेतरी शासनच नियंत्रण असणे गरजेचे आहे.
जयसिंगपूर मधील चौधरी हॉस्पिटल मध्ये लहान मुले नवजात यांच्यावर उपचार केले जातात पण याठिकाणी उपचार सोबत पैश्याची लूट देखील केली जात असल्याचा आरोप जयसिंगपूर मधील एका नागरिकाने केला आहे.तसेच चौधरी हॉस्पिटल मधील पैश्याची लूट कधी थांबणार असा प्रश्न देखील विचारला आहे.
Comments
Post a Comment