Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

धामणीत जल जीवन मिशनचा शुभारंभ ७८ लाख रुपयांची योजना ; सरपंच मारुती खाडे यांच्या हस्ते भूमिपूजन

 धामणीत जल जीवन मिशनचा शुभारंभ. ७८ लाख रुपयांची योजना ; सरपंच मारुती खाडे यांच्या हस्ते भूमिपूजन.

--------------------------------------------------------------------------
फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र
धामणी प्रतिनिधी

------------------------------------------------------------------------

धामणी (ता. माण) या गावासाठी मंजूर झालेल्या ७८ लाख रुपये किंमतीच्या जल जीवन मिशन योजनेच्या कामाचा शुभारंभ आज सरपंच मारुती खाडे यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी संपत खाडे, तानाजी नाकाडे, विजय खाडे भिमराव खाडे, राघू बावदाणे, आशा खाडे हे ग्रामपंचायत सदस्य तसेच माजी सरपंच सदाशिव खाडे, माजी उपसरपंच श्रीमंत खाडे, चंद्रकांत नाकाडे, भागवत खाडे, महादेव सानप, प्रकाश खाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

धामणी गावाची पिण्याच्या पाण्याची योजना गेली अनेक वर्षे रखडली होती. दोनवेळा पाणी योजना मंजूर होवूनही विविध कारणांमुळे रखडली व परत गेली होती. आता पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्यासाठी ही नवीन योजना मंजूर झाली असून ती पूर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेअंतर्गत गावठाण, खाडे वस्ती, पिसाळवस्ती, नाकडेवस्ती आणि इतर काही छोट्या वस्त्यांची पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.


Post a Comment

0 Comments