गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोड्या मधील चोरीस गेलेल्या सोन्याची व रोख रक्कमेची जबाबदारी वरिष्ठ अधिकारी घेणार का?

 गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोड्या मधील चोरीस गेलेल्या सोन्याची व रोख रक्कमेची जबाबदारी वरिष्ठ अधिकारी घेणार का?


गांधीनगर :-गांधीनगरला पश्चिम महाराष्ट्रतील सर्वात मोठी कपड्यांची  बाजारपेठ म्हणून ओळखल् जात  त्यामुळे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांहून व्यापारी कपडे खरेदी करण्यासाठी गांधीनगर मध्ये येत असतात त्यांनी खरेदीसाठी आणलेल्या रोख रकमेवर चोरट्याने हातो हात डल्ला मारला होता  त्या रकमा आज तागायत त्या व्यापाऱ्यांना परत मिळालेल्या नाहीत व गांधीनगर पोलीस ठाण्याच्या लोकसेवकाने परत मिळवून दिल्या नाहीत.

-------------------------------------

मलईदार पोलिस ठाणे म्हणून गांधीनगर पोलीस ठाणे ओळखले जाते.या पोलीस ठाण्यात येण्यासाठी पोलीस अधिकारी धडपडत असतात 

-------------------------------------

गांधीनगर बाजारपेठेत मध्य भागी गांधीनगर पोलीस ठाणे आहे

या पोलिस ठाण्याच्या हद्दीत वसगडे न्यू वाडदे चिंचवाड वळीवडे मुडशिंगी उंचगाव मणेर माळ सरनोबत वाडी तावडे हॉटेल मधील पुर्व बाजू चा भाग येत असून व्यापारी व पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या गरीबांच्या मोल मजूर करून मिळवलेल्या गरीब मजुरांच्या संपत्तीवर चोरट्यांनी अक्षरशः डल्ला मारलेला आहे.

---------------------------------------

सन 25/05/2021 ते 25/05/2023 या लोकसेवकाच्या कारकीर्द तब्बल 140 चोऱ्यांचा तपास लागलेला नाही.याचे गौडबंगाल काय?

--------------------------------------

 लोकसेवक सहाय्यक  पोलिस निरीक्षक यांच्या कारकिर्दीत  चोरट्यांनी धुमाकूळ घालत दिवसा व रात्री तब्बल 140 लहान मोठ्या चो-या व घरफोड्या चोरट्यांनी केल्या आहेत.

मनेरमाळ, उंचगाव सरनोबतवाडी या भागात चोऱ्यांचे प्रमाण अधिक आहे .

जर स्थानिक गून्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना चोर व चोरीला गेलेला मुद्देमाल सापडतो  परंतु गांधीनगर पोलीस ठाण्याच्या लोकसेवकास घरफोडी मधील चोर व मुद्देमाल का सापडत नाही ?

गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनेरमाळ उंचगाव सरनोबतवाडी या भागात चोऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मोठ मोठ्या रक्कमा  व सोन्याचे दागिने चोरीला गेले असून  मुद्दे माल व दागिने का हस्तगत का होत नाही यामागचे गौडबंगाल काय आहे?

-------------------------------------

गांधीनगर पोलीस ठाण्याच्या लोकसेवकास खून मारामारी करणारे आरोपी 24 तासांच्या आत सापडतात मग चोरी करणारे चोरटे का सापडत नाहीत?

------------------------------------


मारामारी खून यामधील आरोपी

24 तासांच्या आत पकडले जातात तर चोरीच्या घटनेमधील आरोपी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या लोकसेवकास का सापडत नाहीत याची चौकशी वरिष्ठ अधिकारी का करत नाहीत

गांधीनगर पोलीस ठाण्याच्या लोकसेवकावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची खास मर्जी का ?  या  लोकसेवकाची  बदली का होत नाही यामागचे कारण काय?

गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून त्याची जबाबदारी नाही का,?याचा विचार व 

याची चौकशी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री.देवेद्र फडवणीस  विशेष पोलीस महानिरीक्षक मा.सुनिल फुलारी.पो अधीक्षक.(  मा.शैलेश बलकवडे यांची पुणे येथील राज्य पोलीस दलाचे समादेशक म्हणून बदली झाली आहे कोल्हापूर नूतन पोलीस अधीक्षक पदी महेंद्र पंडित यांची नियुक्ती  ) अप्पर पोलीस अधीक्षक, करवीर डी वाय एस पी संकेत गोसावी का करत नाहीत ?

चोरी मधील चोरीला गेलेल्या कोट्यवधी रोख रक्कम व सोन्याची जबाबदारी संपूर्णपणे वरिष्ठ अधिकारी घेणार आहेत का? आतापर्यंत किती घरफोड्या सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी उघडकीस आणल्या  असा प्रश्न गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दी मधील नागरिक विचारत आहेत 

लोकसेवक जनतेने भरलेल्या करातून पगार घेतात मग जनतेची चोरीला गेलेल्या मुद्देमाल का हस्तगत करण्याची  जबाबदारी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या लोकसेवकाची नाही का?

या सर्व चोऱ्या व घरफोड्या सहाय्यक पोलीस निरीक्षक या लोकसेवकाच्या  25/05/2021ते25/05/2023 कारकीर्द मध्ये घडलेल्या आहेत याचा विचार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावा?

या  चोऱ्यामधील अनेक चोरटे  सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद असूनही  गांधीनगरचे पोलीस अधिकारी  धृतराष्ट्राची भूमिका का घेत आहेत. त्याचबरोबर गांधीनगर बाजारपेठेमध्ये  दिवसाढवळ्या मोबाईल चोरीचे  शेकडो प्रकरणे  घडत असून त्याची साधी तक्रार दाखल करून घेतली जात नाही. तक्रार दाखल करण्यास काय हरकत आहे त्यामुळे चोरट्याने बळ मिळत असून  अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने  चोरटे मस्त झाले आहेत नागरिकांना मात्र नेहमी भीतीच्या छायेत  वावरावे लागत असून  वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  आता गांधीनगरातील  बेजबाबदार लोकसेवकास आपल्या कार्यालयातच  प्रमोशन देऊन  सेवा करण्याची संधी द्यावी अशी चर्चा आता जनतेतून सुरू आहे

पाहुया उद्याच्या अंकात भाग दुसरा!

 गांधीनगर पोलीस ठाण्याच्या लोकसेवकाच्या आशीर्वादाने गांधीनगर मध्ये  अवैध धंदे सुरू!

डी बी पथक करतंय तरी काय?

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.