Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

संचालक जयश्रीताई सस्ते यांचा निरगुडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार.

 संचालक जयश्रीताई  सस्ते यांचा निरगुडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार.

-----------------------------------

फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र

 गिरवी/प्रतिनिधी

--------------------------------

फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणची निवडणूक नुकतीच उत्साही वातावरणात पार पडली.यामध्ये निरगुडी गावच्या जयश्रीताई गणपत सस्ते या प्रचंड भरघोस मतांनी विजयी.  निरगुडी ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला. यावेळी  ज्योतिर्लिंग विविध कार्यकारी सोसायटी निरगुडीचे संचालक रघुनाथ गोरे, युवक नेतृत्व निलकुमार गोरे, भैरवनाथ तरुण मंडळाचे अध्यक्ष लहुकुमार गोरे,श्रीमंत रामराजे युवा मंच निरगुडीचे संघटक सुनिल गोरे, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे,  अनिल गोरे, पत्रकार सुरज गोरे, अजित गोरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.या सर्वांनी नवनिर्वाचित संचालक जयश्रीताई गणपत सस्ते यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. फलटण बाजार समितीमध्ये पारदर्शक कारभार करून सर्वांचा  विश्वास संपादन करू, अशी ग्वाही त्यांनी दैनिक रोखठोकच्या प्रतिनिधीशी  बोलताना दिली.

Post a Comment

0 Comments