जागा उपलब्ध असतानाही अद्ययावत वैद्यकीय सुविधा का उभारल्या नाहीत राजे समरजितसिंह घाटगे.

 जागा उपलब्ध असतानाही   अद्ययावत वैद्यकीय सुविधा का उभारल्या नाहीत राजे समरजितसिंह घाटगे.

------------------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

मुरगुड प्रतिनिधी

 जोतिराम कुंभार

------------------------------------------------

 मुरगुड येथे 1 कोटी 40 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ.

 कागल विधानसभा मतदारसंघात अंगणवाडी, आरोग्य, प्राथमिक शाळा हे समाजातील मूलभूत घटक अनेक  पायाभूत सुविधांपासून आजही वंचित आहेत. कागल सारख्या शहरात तर वैद्यकीय सुविधांसाठी मुबलक शासकीय जागा उपलब्ध असतानाही स्वतःला महाडॉक्टर म्हणून घेणाऱ्यांनी अद्ययावत वैद्यकीय सुविधा का उभारल्या नाहीत असा सवाल भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केला.

    मुरगुड (ता.कागल) येथे राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या 1 कोटी ४०लाख रुपयांच्या  विकासकामांचा शुभारंभ तसेच संजय गांधी,इंदिरा गांधी, श्रावणबाळ योजनेतील 155 पात्र लाभार्थ्यांच्या मंजुरी पत्रांच्या वितरण प्रसंगी आयोजित केलेल्या संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते.

     यावेळी शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले.

         ते पुढे म्हणाले  म्हणाले,तालुक्याच्या  विकासासाठी आजपर्यंत 54 कोटी रुपयांचा निधी आणलेला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत आणखी 150 कोटी रुपये निधी खेचून आणल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही.

      यावेळी बोलताना गोकुळचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील म्हणाले,येत्या विधानसभा निवडणुकीत मुरगुड मधून विरोधकांपेक्षा राजेंना मोठे मताधिक्य देऊ .आगामी निवडणुकीत भाजपचा आमदार झाल्यास तालुक्यातील एजंटगिरीला कायमची मूठमाती मिळेल आणि शासकीय योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचतील असा मला विश्वास आहे .

        यावेळी चित्रकार राजेंद्र कांबळे (मुरगूड) यांनी   वॉल पेंटिंग तयार केल्याबद्दल राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बिद्रीचे माजी संचालक सुनीलराज सूर्यवंशी,अरुण गुरव यांनी मनोगत व्यक्त केले.

           या कार्यक्रमासाठी बिद्रीचे माजी उपाध्यक्ष दत्तामामा खराडे,मुरगुडचे माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, शाहू कृषी संघाचे चेअरमन अनंत फर्नांडिस,किसान मोर्चाचे अध्यक्ष प्रताप पाटील,भाजप शहराध्यक्ष बजरंग सोनुले, सदाशिव गोधडे,अशोक खंडागळे, अमर चौगुले, विजय राजीगरे, संजय चौगुले, राहुल कांबळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   स्वागत प्रास्ताविक सुशांत मांगोरे यांनी केले तर आभार राजू चव्हाण यांनी मानले.....


शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना मंजूर पत्रांचे वाटप करताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे, रणजीतदादा पाटील सोबत इतर मान्यवर......

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.