Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शिरोली एमआयडीसी पोलिसांकडून चार सराईत चोरट्यांना अटक! 48 तासात साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.

शिरोली एमआयडीसी पोलिसांकडून चार सराईत चोरट्यांना अटक! 48 तासात साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.

-------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------

  सराईत घरफोडी करणा - या आरोपींना शिरोली एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथकाने केले ४८ तासाचे आत जेरबंद. आरोपी कडून तब्बल ४,२० , ९ ५० / - रुपयाच्या घरफोडीचा केला उलघडा. 

दिनांक २३/०७/२०२३ रोजी रात्री ०८.०० पासून २४/०७/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाचे दरम्यान मुदतीत सांगली फाटा शिरोली पुलाची ता . हातकणंगले येथील साई मेटल स्क्रॅप गोडावूनमधील २.८४.९ ५० / रुपयेचे ज्या मध्ये तांब्याचे स्क्रॅप अंदाजे ४१० किलो वजनाचे प्रति किलो तांबेची स्क्रॅपची किंमत ६ ९ ५ / - रुपये प्रमाणे असे फिर्यादी ताचंद पारेख प्रविण व.व .६० धंदा - भांडी दुकान रा . प्लॉट न . ७. सांवत होसींग सोसायटी , सम्राटनगर , यांनी पोलिसांनी दिली. 

गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळताच कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार मा . महेंद्र पंडीतसो पोलीस अधिक्षकसो . अपर पोलीस अधिक्षकसो श्रीमती जयश्री देसाई मॅडम , व श्री . संकेत गोसावीस उपविभागीय पोलीस अधिकारीसो . करवीर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मा . सहा . पोलीस निरीक्षक पंकज गिरी , पोहेका समीर मुल्ला , पोहेको ऋषिकेश पवार , पोहेको नजिर शेख , पोना प्रविण काळे पो को दादासो मोठे पो को निलेश कांबळे , पो कॉ सचिन पाटील , शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे  यांनी चार आरोपीच्या मुसक्या आवळत मुद्देमाल हस्तगत केला. यातील चारी आरोपी हे सराईत आहेत. आरोपीचे नाव [ १ ] अविनाश शांताराम कोकाटे व.व .२४ रा . एस . एस . सी . बोर्ड जवळ , कंजारभाट वसाहत , मोतीनगर , कोल्हापुर शुस्वप्निल उर्फ ता - या महेश गांरुगे व.व. २३ रा . एस . एस . सी . बोर्ड जवळ , कंजारभाट वसाहत , भोतीनगर , कोल्हापुर ३ ) सचिन दत्तात्रय गवळी व.व. रा . राजेंद्र नगर , कोल्हापुर ४ सतिश राजेश बांदुगे व.व. २४ रा . एस . एस . सी . बोर्ड जवळ , कंजारभाट वसाहत , मोतीनगर ,  सदर गुन्हयाचा तपास पो.हवा . ऋषिकेश पवार करत होते . सदर गुन्हयाचे अनुषंगाने तपास करत असताना गुन्हे शोध पथकाकडील अंमलदार यांना गोपनिय बातमीदारामार्फेत मिळाले नुसार वरील आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस आणण्यात आला.

Post a Comment

0 Comments