Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाचे वतीने महसूल दिनानिमित्त विविध कार्यक्रम.

 सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाचे वतीने महसूल दिनानिमित्त विविध कार्यक्रम.

सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली  एक ऑगस्ट पासून महसूल सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने विविध उपक्रमाबरोबरच जिल्ह्यात उत्कृष्ट सेवा बजावण्यारे महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव जिल्हाधिकारी व मान्यवरांचे हस्ते करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या ‌ संकल्पनेतून होत असलेला महसूल दिन समाजाभिमुख पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.  एक ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येणार असून महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.  महाराजसव अभियानांतर्गत उपविभागनिहाय उत्कृष्ट सेवा करणारे प्रांताधिकारी, तहसीलदार,नायब‌तहसिलदार, अव्वल कारकून, मंडलाधिकारी, महसूल सहाय्यक, तलाठी, पोलिस पाटील व कोतवाल यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच कलम १५५‌ अंतर्गत सर्व प्रकरणाबाबत विषेश मोहीम ‌ राबविण्यात येणार आहे

 दिनांक २ ऑगस्ट रोजी ‌युवा‌संवाद आयोजित करण्यात आला आहे.‌शालेय शिक्षण व प्रवेशासाठी आवश्यक दाखले वितरित करण्यात येणार आहेत. दाखल्याची आवश्यक कागदपत्रे  याबाबत प्रचार मोहीम राबविण्यात येणार आहे. दिनांक ३ ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत नैसर्गिक आपत्ती कालावधीत नागरिकांनी घ्यावयाची काळजी बाबत  सूचना पोहचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. दिनांक ४ ऑगस्ट रोजी जनसंवाद या उपक्रमाअंतर्गत महसूल महाअदालतीचे आयोजन करुन प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येतील. दिनांक ५ ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमाअंतर्गत संरक्षण दलातील अधिकारी व सैनिक यांच्या कुटुंबीयांना आवश्यक असणारे ‌महसुल विभागातील दाखले व प्रमाणपत्र याबाबत प्रलंबित ‌ प्रकरणे निकाली काढण्यात येतील. दिनांक ६ ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी यांच्याशी संवाद या कार्यक्रम अंतर्गत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येतील. दिनांक ७ ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह सांगता समारंभात ‌महसुल यंत्रणेमार्फत विविध प्रकारच्या घेण्यात आलेल्या उपक्रमांचा लेखाजोखा मांडला जाणार आहे अशी माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments