Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पत्रकार बातमीचे व्हिडिओ चित्रीकरण करू शकतात!

 सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पत्रकार बातमीचे व्हिडिओ चित्रीकरण करू शकतात!  

------------------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र संपादक

शशिकांत कुंभार

------------------------------------------------

पत्रकारांना चित्रीकरण करण्यास मज्जाव करून अपशब्द वापरल्याबददल सातारचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी

सातारा : सातारा जिल्हा परिषद येथे सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वाखरी तालुका फलटण येथील एका विद्यालयातील विद्यार्थी व पालक न्याय मागण्यासाठी मोर्चा घेऊन आलेले होते. आमच्या दैनिक सुपर भारत व फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र चे सातारा जिल्हा प्रतिनिधी किरण अडागळे त्यावेळी त्या ठिकाणी वृतसंकलनासाठी उपस्थित होते. मोर्चा आल्याने ते व्हिडिओ चित्रीकरण करत असताना मोर्चाचे म्हणणं ऐकण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी आले असताना खिलारी यांनी त्यांचे अंगरक्षक पोलिस लाड यांना यांचा मोबाईल हिसकावून घ्या,असे सांगितले व लाड यांनी मोबाईल हिसकावून घेत असताना किरण अडागळे यांनी लाड यांना सांगितले की मला व्हिडिओ चित्रीकरण करण्यास तुम्ही मज्जाव करू शकत नाही, असे सांगितले. परंतु लगेच मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, असा दम भरला व त्यांना अपशब्द वापरले.सदर घटनेनंतर माझ्याशी मोबाईल वर संपर्क करुन त्यांना मला सांगितली त्यांनंतर पत्रकार यांना चित्रीकरण करण्यास कोणी मज्जाव करू शकत नाही, असे अडागळे यांना मी सांगितले व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा मोबाईल नंबर पाठवा म्हणून मोबाईल नंबर आणण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात त्यांचे पी.ए. देसाई यांच्या कडे जाऊन मोबाईल नंबर मागितला असता त्यांना सीओ यांच्या पीए यांनी मोबाईल नंबर देत नाही, जा तुला काय करायचं ते कर असा एकेरी भाषेत उल्लेख केला. असा कायदा नाही म्हणून असभ्य भाषेत वर्तन केले. म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी व पीए देसाई यांच्या वर सर्वोच्च न्यायालयाचा आदेशा धुडकावून दिल्यामुळे यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. असे 

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र व दैनिक सुपर भारत कोल्हापूर संपादक शशिकांत कुंभार यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments