Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

नागाव चा पाणीप्रश्न ऐन पावसाळ्यात पेटणार वडगांव च्या ग्रामस्थांचा पाणी देण्यास नकार.

 नागाव चा पाणीप्रश्न ऐन पावसाळ्यात पेटणार वडगांव च्या ग्रामस्थांचा पाणी देण्यास नकार.

----------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------

मौजे वडगाव येथील लघु पाटबंधारे अंतर्गत    पाझर तलाव हा मौजे वडगाव साठी राखीव आहे.हा तलाव 1972 साली पूर्ण झाला असून त्यासाठी लागणारी जमीन गावातील शेतकऱ्यांनी दिली आहे.सदरच्या तलावातून नागाव गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन केली जाणार आहे. ही बाब मौजे वडगाव ग्रामस्थांना समजताच ग्रामसभेमध्ये  यास तीव्र विरोध करण्यात आला व तसा ठराव करून पाटबंधारे विभागाला देण्यात आला.त्यानंतर पाटबंधारे विभागाने दोन्ही गावच्या प्रमुख पदाधिकारी यांची संयुक्त बैठक बोलविण्यात आली होती.

या बैठकीमध्ये ह्या तलावावर वडगावकरांचा हक्क आहे,त्यांचा कोठा पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पाणीसाठ्यातुन आम्हाला पाणी मिळावे अशी मागणी नागाव ग्रामपंचायतीने केली.परंतु मोजे वडगाव ची भविष्यात वाढणारी लोकसंख्या व तलावातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता पाणी टंचाई निर्माण होऊ शकते,त्यामुळे तलावातील एक थेंब ही पाणी देणार नाही अशी ठाम भूमीका मौजे वडगावकरांनी घेतल्याने ही बैठक निष्फळ ठरली. ही बैठक कार्यकारी अभियंता ,पाटबंधारे विभाग स्मिता माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी दोन्ही गावचे सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments