Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विदेशी दारूची अवैद्य वाहतूक प्रकरणी एकास अटक.

 विदेशी दारूची अवैद्य वाहतूक प्रकरणी एकास अटक.

सातारा ::  डी.बी पथकातील स्टाफ यांना गोपनीय माहिती आधारे माहिती मिळाली असता शिवराज पेट्रोल पंप रोडने सापळा रचून चार चाकी गाडी पकडली गेली त्यात विदेशी दारू च्या 149 बाटल्या सापडल्या सदर वाहन चालकजवळ सदर माल वहातुकीचा परवाना नसलेबाबत व तो माल विक्रीकरिता नेत असल्याबाबत सांगितले. सदरचा विदेशीदारू माल व चार चाकी असा एकूण मिळून 3,66,705/रु.चा मुद्दे माल जमा करण्यात आला.सदर आरोपीचे नाव सचिन गोरख साळुंखे वय 34. राहणार नागठाणे, तालुका जिल्हा सातारा असून सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक समीर शेख. मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री बापू बांगर, मा.पोलीस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी, मा. पोलीस निरीक्षक श्री धनंजय फडतरे यांचे मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाचे पो उप निरीक्षक श्री. सुधीर मोरे, पो हवालदार सुजीत भोसले, पो नाईक निलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते. पो कॉन्स्टेबल सागर गायकवाड, गणेश घाडगे, संतोष कचरे, सुशांत कदम, विशाल धुमाळ, मच्छिन्द्रनाथ माने यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments