Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अवैद्य गुटखा साठा प्रकरणी डी.बी.पथकाची एकावर कारवाई.

 अवैद्य गुटखा साठा प्रकरणी डी.बी.पथकाची एकावर कारवाई.

 सातारा;-शहर परिसर राधिका रोड येथे पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती प्राप्त झाल्यावर डी.बी.पथकाने आरोपी शंभो दत्तात्रय शिंदे यास पांढऱ्या गोणीत आणलेल्या 22646/ रुपये किंमतीच्या अवैद्य गुटखा मुद्देमालासह पकडले असता,त्याने तो गुटखा विक्रीकारिता आणला असल्याचे देखील कबूल केले. अन्नसुरक्षा अधिकारी यांना कळविण्यात आल्यानंतर मालाबाबत त्यांनी खात्री केली. तदनंतर सदर व्यक्तीवर गुन्ह्यांची कारवाई करण्यात आली असून पुढील तपास म.पो.निरीक्षक चांदणी मोरे करीत आहेत.सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.समीर शेख.मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री.बापू बांगर.मा.उप.वि. पोलीस अधिकारी सो.किरण कुमार सूर्यवंशी, मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री हेमंत कुमार शहा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेप्रकटिकरण पथकचे पोलीस उपनिरीक्षक श्री सुधीर मोरे, पोलीस हवलदार सुजीत भोसले, पोलीस नाईक विक्रम माने, पंकज मोहिते. पोलीस कॉन्स्टेबल विशाल धुमाळ, संतोष कचरे, गणेश घाडगे, सागर गायकवाड, मच्छिन्द्रनाथ माने, सुशांत कदम, यांनी कामगिरी बजावली.

Post a Comment

0 Comments