Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

न्यू वाडदे ब्रँच विक्रम हायस्कूलचे मुख्याध्यापक संभाजी सुतार यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभ.

 न्यू वाडदे ब्रँच विक्रम हायस्कूलचे मुख्याध्यापक संभाजी सुतार यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभ.

-----------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सांगवडे प्रतिनिधी 

विजय कांबळे

-----------------------------------------------

सांगवडे - ता. 19 अंतरीक समाधान हे फक्त शिक्षण क्षेत्रातच मिळते चांगल्या प्रकारची मूल्ये जपली की जीवन आनंददायी करता येते. दिखाऊ पेक्षा टिकाऊ जीवन पाहिजे आणि हेच जीवन संभाजी सुतार जगत आहेत असे मत डाएटचे माजी प्राचार्य डॉ. विलास पाटील यांनी व्यक्त केले. ते न्यू वाडदे ब्रँच विक्रम हायस्कूलचे मुख्याध्यापक संभाजी सुतार यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी शैक्षणिक विचारवंत शिराळाचे अशोकराव भोईटे म्हणाले, चांगल्याला चांगलं म्हणायचं हे शिक्षणातूनच समजते आणि हे रुजवण्याचं काम संभाजी सुतार यांनी केल आहे. सत्कारमूर्ती संभाजी सुतार म्हणाले, मी शिक्षण सामाजिक क्षेत्रात जे काम केले आहे ते केवळ तुम्हा सर्वांचे मुळे म्हणून या देखण्या सोहळ्याचे तुम्ही साक्षीदार आहात. अध्यक्ष स्थानावरून बोलताना शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त परीक्षा नियंत्रक बी.एम. हिर्डेकर

 म्हणाले, असे आमचे यशस्वी झालेले विद्यार्थी बघताना मन आनंदाने भरून जाते. सुतार यांनी मुख्याध्यापक, समुपदेशक म्हणून केलेले काम गौरवास्पद आहे. यावेळी महाराष्ट्र इतिहास महामंडळ पुणे चे कार्याध्यक्ष बि.डी. शिंदे, , बबन सुतार, तानाजी सुतार, आनंदराव सुतार , सुचिता कापसे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन संभाजी सुतार सेवापूर्ती गौरव समितीने केले. रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सत्कारासाठी बुके शाल श्रीफळ ऐवजी वह्या पेन द्या असे आवाहन सुतार परिवाराने केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या वह्या गरजू गरीब विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. विद्यासागर चौगुले यांनी स्वागत केले. मिलिंद टाकळे यांनी मानपत्र वाचन केले. प्रकाश बिरनाळे यांनी आभार मानले. प्रकाश नलवडे यांनी सूत्रसंचालन केले.

Post a Comment

0 Comments