Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जावळीत एका दिवसात पाच दारूविक्रीवर कारवाया अन् ऐन पावसाळ्यात दारूचा महापुर .

 जावळीत एका दिवसात पाच दारूविक्रीवर कारवाया अन् ऐन पावसाळ्यात दारूचा महापुर .

 जावळीची राजधानी मेढा व संपूर्ण तालुक्यात अवैध दारुविक्रीवर कारवाई न झाल्यास पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री मा ना . शभूराज देसाई यांना दारुच्या बाटल्या भेट देणार, असा आंदोलनाचा इशारा व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष विलासबाबा जवळ यांनी देताच मेढा पोलीसांनी सुसाट छापेमारी करत एकाच दिवसात जावळी तालुक्यात  पाच ठिकाणी बेकायदेशीर दारुविक्रीवर कारवाया करत तब्बल सात हजार रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या. या छापेमारीने मेढा पोलीस नेमके कोणाला घाबरले पालकमंत्री की विलासबाबा याची खुमासदार चर्चा जावली खोऱ्यात सुरु झाली आहे.

सोनगाव, ता. जावली हद्दीत प्रतापगड हॉटेलच्या पाठीमागे सुरु असलेल्या दारुविक्रीवर छापा मारून पोलिसांनी अभयसिंह राजेंद्र घोरपडे (वय 33, रा. कुडाळ, ता. जावली, मूळ रा. भाडळे, ता. कोरेगाव) याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून एक हजार चारशे सत्तर रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.कुडळ, ता. जावली येथे बोराटेवस्तीच्या पाठीमागे छापा मारून अतुल रमेश खटावकर (वय 56, रा. कुडाळ) याच्यावर कारवाई करून एक हजार पाचशे चाळीस रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.भणंग, ता. जावली येथे मारुती मंदिराच्या आडोशाला छापा मारून मोहन नाथाब्बा सुतार (वय 55, रा. भणंग) याच्यावर कारवाई करत त्याच्याकडू दोन हजार चारशे पन्नास रुपयांच्या दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.करहर, ता. जावली येथे खर्शीबारामुरे रस्त्याच्या वखारीच्या आडोशाला छापा मारून बबन गणपत धनावडे (वय 65, रा. खर्शीबारामुरे) याच्यावर कारवाई करून एक हजार चारशे सत्तर रुपयांच्या दारुच्या बाटल्या जप्त

करण्यात आल्या.केळघर, ता. जावली येथे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भिंतीच्या आडोशाला छापा मारून नितीन चंद्रकांत दळवी (वय 30, रा. केळघर) याच्यावर कारवाई करू एक हजार चारशे सत्तर रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

एकाच दिवसात पाच कारवाया केल्यामुळे मेढा पोलीस ठाणे हद्दीत दारुविक्री सुरु असल्याचा मुद्दा अधोरेखीत झाला असून मेढा पोलीस ठाण्याचे कारभारी नेमके काय करतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. खरंतर येथील संतोष तासगावकर एक डॅशिंग अधिकारी असले तरी त्यांचा अवैध धंद्यांवरील वचक कमी झालाय की अन्य कोणते कारण आहे याबाबत जावली तालुक्यात चर्चा आहे.

Post a Comment

0 Comments