Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

हेल्मेट चे महत्व सांगत प्रबोधन करत हेल्मेटसक्ती साठी RTO ची शिरोली MIDC मध्ये धडक मोहीम.

 हेल्मेट चे महत्व सांगत प्रबोधन करत  हेल्मेटसक्ती साठी RTO ची शिरोली MIDC मध्ये धडक मोहीम.

-------------------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------------------

कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आदेशानुसार संपूर्ण जिल्हाभर हेल्मेटसक्ती साठी प्रादेशिक परिवहन विभागातर्फे कडक मोहीम राबविण्यात येत आहे. 15 दिवस अगोदर MIDC मधिल सर्व छोट्या मोठ्या उद्योगांना कामगारांना हेल्मेटसक्ती करण्याच्या नोटीस परिवहन विभागाकडून देण्यात आल्या आहेत.तसेच मोठमोठया कंपनीच्या गेटबाहेर परिवहन विभागाकडून नोटीस चिकटविण्यात आल्या आहेत.संपूर्ण दिवसभर MIDC परिसरातील वेगवेगळ्या भागात टू व्हीलर धारकांना अडवून हेल्मेटसक्ती साठी दंडात्मक रक्कम आकरण्यात येत आहे. तसेच पी यु सी, इन्शुरन्स, फिटनेस ची तपासणी करण्यात येत आहे.तसेच लोकांमध्ये हेल्मेटसक्ती चे महत्त्व सांगून त्यांचे प्रभोधन ही करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व MIDC मध्ये RTO ची पथके तैनात असुन संपुर्ण दिवसभर ही कारवाई ची मोहीम चालू आहे.तसेच दिवसेंदिवस ही कारवाई आणखीन कडक करणार असल्याचे तपास पथकातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments