Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शासकीय रुग्णालयात 15 ऑगस्ट पासून पुर्णपणे मोफत उपचार,केवळ रक्तासाठीच पैसे - सिव्हिल सर्जन डॉ युवराज करपे.

 शासकीय रुग्णालयात 15 ऑगस्ट पासून पुर्णपणे मोफत उपचार,केवळ रक्तासाठीच पैसे - सिव्हिल सर्जन डॉ युवराज करपे.

राज्य शासनाच्या मोफत आरोग्य सेवा धोरणाची अंमलबजावणी पंधरा ऑगस्ट पासून करण्यात येणार आहे.‌ त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात फक्त रक्तासाठी फी आकारली जाईल. त्याव्यतिरिक्त सर्व उपचार व चाचण्या तसेच केसपेपर साठी कोणत्याही नागरिकाला पैसे द्यावे लागणार नाही. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, तसेच उपजिल्हा व जिल्हा रुग्णालय अशी आरोग्य विभागाचि यंत्रणा उभारली आहे. या यंत्रणांच्या माध्यमातून नागरिकांना माफक दरात विविध प्रकारच्या आरोग्य सुविधा पुरविल्या  जात होत्या. बर्याच नागरिकांना हे शुल्क भरणे सुद्धा शक्य नव्हते. या सर्व गोष्टींचा विचार शासनाने करून पंधरा ऑगस्ट पासून सर्व आरोग्य सेवा मोफत केल्या आहेत.  त्यामुळे शासकीय रुग्णालयात केवळ रक्तासाठीच पैसे भरावे लागणार आहेत.  ही योजना सुरू करताना औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून शासनाकडून काळजी घेतली जात आहे. त्यासाठी राज्य पातळीवर औषधे उपलब्ध न झाल्यास स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा शल्य चिकित्सक यांना अधिकारी दिले आहेत. या योजनेची अंमलबजावणी 

करण्यासाठी शासनाने जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. जिल्हा स्तरावर शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आरोग्य अधिकारी सह अध्यक्ष , निवासी वैद्यकीय अधिकारी ( बाह्य संपर्क ) हे सदस्य सचिव,तर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक , प्रशासकीय अधिकारी व मेट्रन हे सदस्य असणार आहे. तालुका स्तरावर वैद्यकीय अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली, तालुका वैद्यकीय अधिकारी सह अध्यक्ष, सहाय्यक अधीक्षक सदस्य सचिव,तर एका प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हे सदस्य सचिव असतील. उपचार किंवा चाचण्यांसाठी  पैशाची मागणी केल्यास ही समिती चौकशी व कारवाई करेल.  शासकीय रुग्णालयात  केल्या जाणाऱ्या ईसईजई, एक्स रे,सिटी स्कॅन, रक्त व लघवीच्या प्रयोग शाळा चाचण्या, सोनोग्राफी यासाठी नागरिकांना शुल्क भरावे लागत होते परंतू आता या सर्व चाचण्या मोफत होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना पैशाबरोबरच रांगेचा त्रास होणार नाही. तसेच कोणीही पैशाची मागणी केल्यास 104 या नंबरवर फोन करावा अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.   युवराज करपे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments