Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कौलवचे सुवर्ण महोत्सवी आदर्शवत युनियन तरूण मंडळ..

 कौलवचे सुवर्ण महोत्सवी आदर्शवत युनियन तरूण मंडळ..

--------------------------------------------

कौलव प्रतिनिधी 

संदीप कलिकते

--------------------------------------------

 छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या व निसर्ग सौंदर्याने नटलेल्या, हरित क्रांती झालेल्या राधानगरी तालुक्यातील भोगावती नदीच्या काटावर तालुक्याची राजधानी म्हणून ओळखले जाणारे मोठ्या लोकसंख्येचे कौलव हे गाव.या गावात अनेक थोर पुरुष जन्माला आले, यामध्ये प्रामुख्याने कै.दादासाहेब पाटील कौलवकर, बाळासाहेब पाटील कौलवकर, आनंदराव पाटील कौलवकर,  शंकरराव पाटील कौलवकर होते.या दिग्गज नेत्यांनी भोगावती परिसरात आर्थिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात दिशा देण्याचे काम केले आहे.

  बॅका, साखर कारखाना, जिल्हा परिषद, इतर विविध संस्था यांच्या माध्यमातून या कौलवकरांनी तालुका, जिल्हा पातळीवर अधिराज्य गाजवले,तो काळ स्वातंत्र्य नंतरचा  असल्याने.हळुहळु सामाजिक प्रगती होऊ लागली होती.गावोगावी तरूण एकत्र येऊन सामाजिक संघटन करु लागले होते.असेच संघटन सन १९७६साली कौलव मध्ये बारा बलुतेदारांची असणार्या कुंभार गल्ली मध्ये अॕड.अरुण सोनाळकर यांच्या पुढाकाराने  युनियन तरूण मंडळाची स्थापना करुन झाले.

 मंडळाची स्थापना करताना अनेक संघर्ष, आर्थिक अडचणींना सामना करावा लागला.या मंडळाच्या वतीने लेझीम पथक तयार करून ते जिल्ह्यात नावारूपाला आणले, मोठमोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात, लग्नसमारंभात युनियन तरूण मंडळाच्या लेझीम पथकाला मागणी येऊ लागली.त्यामुळे  मंडळाला, तरुणांना आर्थिक आधार मिळाला.मंडळाची सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल असुन,मंडळाचा गणेशोत्सव हा तालुक्यातील आर्कषणाचा बिंदू ठरला आहे.

  गेल्या ४६ वर्षात मंडळाने अनेक सामाजिक उपक्रम राबवून तालुक्यात आदर्श घालून दिला आहे.कोणतेही आर्थिक पाठबळ

 नसताना श्रमदानातून मंडळाची वाटचाल समाजाला दिशा देण्याचे काम चौथी पिढी करीत आहे.सामाजिक उपक्रम म्हणून हलते देखावे, हळदीकुंकू समारंभ, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज जयंती, गुणवंतांचा सत्कार, शालेय विद्यार्थ्यांना मदत,२६जानेवारी,१५ऑगस्ट या राष्ट्रीय सणादिवशी शालेय मुलांना खाऊ वाटप असे विविध उपक्रम राबविले जातात.

 या मंडळाचे अनेक कार्यकर्ते शैक्षणिक, राजकीय, सामाजिक,सहकार, शासकीय आणि उद्योग क्षेत्रात आपले काम प्रामाणिकपणे बजावित आहेत.चालु वर्ष हे मंडळाचे ४७वे वर्ष असुन यावर्षीची गणेश मूर्ती सर्वांच्या आर्कषणाची ठरणार असुन, यावर्षीचा गणेशोत्सव प्रशासनाला सहकार्य करीत विविध सामाजिक उपक्रम राबवून करणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष विनायक बुवा, उपाध्यक्ष विकास भांदिगरे,खजानीस शशिकांत लोहार (बबलु) यांनी सांगितले यावेळी मंडळाचे माजी पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Rs999/- च्या 2 जीन्स 1399/-

(600/- रुपयांची बचत)

Rs999/- च्या 3 जीन्स 1999/-

(1000/-रुपयांची बचत)

Rs799/- चे     3 शर्ट.    1299/-

 (1100/- रुपयांची बचत)

Rs799/- च्या 2 पॉपकॉन/पीनट/ट्वील     अरमानी.(हेवी क्वालिटी)                899/- (700/-रुपयांची बचत)

Rs 450/- चे दोन स्वीट टी-शर्ट 499/-

 (400/- रुपयांची बचत)

Rs450/- च्या दोन ट्रॅक्ट पॅन्ट 599/-

(300/- रुपयांची बचत)

Rs699/-चे दोन स्वेट जॅकेट 999/-

   (400/-रुपयांची बचत)

Rs699/- TPU JACKET 2 फक्त              

899/-.   (500/-रुपयांची बचत)

ब्रँडेड टी-शर्ट /जॅकेट्स वरती 25% सूट...

Zeel renkot  20% सूट...

लेडीज अँड किड्स वेअर -25% सूट..

अशा असंख्य ऑफर घेऊन येत आहे. 

अमर कलेक्शन पाचवड तालुका वाई जिल्हा सातारा  

ऑफर मर्यादित दिवसापूतीं राहील.

Post a Comment

0 Comments