Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

निकालातील चुकीचा फटका बसलेल्या विद्यार्थ्याला न्याय द्या.

 निकालातील चुकीचा फटका बसलेल्या विद्यार्थ्याला न्याय द्या.

 कोल्हापुर-शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राच्या माध्यमातून बी.कॉम अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिलेल्या एका विद्यार्थ्याच्या निकालात विद्यापीठाकडून चूक झाली आहे. या चुकीचा फटका बसलेल्या विद्यार्थ्याला विद्यापीठाने योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणी कोल्हापूर शहर विद्यार्थी काँग्रेसने(एनएसयुआय) आज केली.त्याबाबतचे निवेदन एनएसयुआय'च्या शिष्टमंडळाने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.आदित्य जाधव यांना दिले.

या संबंधित विद्यार्थ्यावर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आहे त्याच्या करिअरचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे याबाबत विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे.

या विद्यार्थ्याला विद्यापीठ कसा न्याय देणाऱ्याची माहिती आम्हाला द्यावी. निकालात अशा चुका वारंवार होऊ नयेत,यासाठी दोषींवर त्वरित कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा एनएसयुआय'चे अध्यक्ष अक्षय शेळके यांनी दिला. संबंधित विद्यार्थ्याला न्याय दिला जाईल असे डॉ.जाधव यांनी सांगितले.

यावेळी मुबीन मुश्रीफ, अथर्व चौगुले,यश शिर्के, आसिफ शेख, समर्थ पाटील, शिवराज गोडसे,आयान शेख आदित्य चौगुले उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments