Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

तुर्भे येथे 'रेलवे जागरूकता अभियान' कार्यक्रमाचे आयोजन पोलिसांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

 तुर्भे येथे 'रेलवे जागरूकता अभियान' कार्यक्रमाचे आयोजन पोलिसांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

नवी मुंबई (तुर्भे ):- नुकताच आरपीएफ पोलिस ठाणे तुर्भे व डॉ. एच. व्ही. सामंत विद्यालय तुर्भे यांच्या सयुंक्त विद्यमाने सामंत विद्यालयात 'रेलवे जागरूकता अभियान' कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 

या कार्यक्रमास माजी नगरसेविका शुभांगी पाटील, आरपीएफ तुर्भे पोलीस निरीक्षक सुनील कुमार यादव, उप निरीक्षक ममता जगमाल, उप निरीक्षक संदीप बारई, सहा उप निरीक्षक आप्पा मांडे, सहा उप निरीक्षक निलेश लोंढे तसेच विद्यालयाच्या उप मुख्याध्यापिका सौ विजया कोळी, पर्यवेक्षक सुनील कोळी सर, जेष्ठ शिक्षक धनगर सर उपस्थित होते. या प्रसंगी शुभांगी पाटील यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना रेल्वे संबंधी माहिती देऊन मार्गदर्शन केले. तसेच आरपीएफ च्या अधिकाऱ्यांनी रेलवे चे नियम व कायदे तसेच विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी या विषयी सखोल मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश ठाकुर सर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उप मुख्याध्यापिका सौ. विजया कोळी यांनी आरपीएफ पोलीस व उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments