Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सामाजिक कार्याकमातून लोकप्रबोधनासाठी सार्वजनिक मंडळांनी पुढाकार घ्यावा. स. पो. नि.अर्जुन घोडे पाटील.

 सामाजिक कार्याकमातून  लोकप्रबोधनासाठी सार्वजनिक मंडळांनी पुढाकार घ्यावा. स. पो. नि.अर्जुन घोडे पाटील.

सार्वजनिक गणेश उत्सव सोहळा साजरा करताना पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे काही कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहपणामुळे कायदा आणि सुव्यवस्था भंग होणार नाही याची दक्षता प्रत्येक मंडळांनी घेणे गरजेचे आहे. परिवर्तनशील व पर्यावरण पूरक सामाजिक कार्यक्रमातून लोकप्रबोधनासाठी सार्वजनिक मंडळांनी पुढाकार घ्यावा असे आव्हान गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी केले.  ते गडमुडशिंगी येथे आयोजित केलेल्या शांतता बैठकीत बोलताना म्हणाले.

 गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडमुडशिंगी ग्रामपंचायत आणि  गांधीनगर पोलीस ठाण्याच्या वतीने गडमुडशिंगी येथील गणेश उत्सव मंडळ पदाधिकारी,  लोकप्रतिनिधी यांची बैठक आयोजित केली होती.

 पोलिसांनी घालून दिलेल्या नियम आणि अटींचे पालन करून हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करून प्रत्येक मंडळांनी समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम साजरे करावेत. यावेळी गणेश मंडळानी प्रबोधनात्मक देखावे सादर करणाऱ्या मंडळांना वेळ वाढवून द्यावी,  न्यायालयाच्या आदेशानुसार दोन बेस दोन टॉप लावण्याची परवानगी द्यावी,विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी आणि लेसरशो ला ही परवानगी द्यावी अशी मागणी केली. पण पोलीस प्रशासनाने डॉल्बी आणि लेसर शो मुक्त  गणेश उत्सव आणि विसर्जन मिरवणूक साजरी करण्यासाठीच परवानगी दिली जाईल.  आणि कायद्याचे काटेकोर पालन केले जाईल अशा सक्त सूचना सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पाटील,यांनी केले. ग्रामपंचायत कर्मचारी नितेश डकरे यांनी सूत्रसंचालन केले.  या बैठकीस ग्रामपंचायत सदस्य अशोक दांगट,सुदर्शन पाटील, जितेंद्र यशवंत, संजय पाटील, अरुण शिरगावे, विनोद सोनुले, भैय्या नेर्ले, रविराज सोनुले, व विविध मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments