Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

करवीर पोलीस ठाणे अंतर्गत लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन.

करवीर पोलीस ठाणे अंतर्गत लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन.

--------------------------------------------------------------------------------------

--------------------------------------------------------------------------------------

  अलंकार हॉल पोलीस मुख्यालय कोल्हापूर येथे करवीर पोलीस ठाणे अंतर्गत भव्य निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करवीर पोलीस ठाणे यांचे वतीने करण्यात आले होते.या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला.

  या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला, सदर निबंध व चित्रकला स्पर्धे करिता लहान गट पाचवी ते सातवी, मोठा गट आठवी ते दहावी  अशा प्रत्येकी दोन्ही गटात एकूण 152 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला, सदरच्या स्पर्धा या मुलांच्या चांगल्या वागण्या बरोबरच त्यांच्याकडील कौशल्यांना, गुणवत्तेला, कला गुणांना वाव मिळण्याकरता, तसेच त्यांचे विचार जाणून घेऊन पोलीस जनता संवाद दृढ होण्याकरिता सदरची स्पर्धा आयोजित करून त्याचे विषयही  वास्तविकतेवर आधारित व सद्य, व भविष्यातील परिस्थितीची गरज ओळखून  असे ठेवण्यात आले होते. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन, त्यांच्याशी संवाद साधून, त्यांना शुभेच्छा देऊन गौरवण्यात आले.

   दरम्यान कु.दिव्या रजपूत या विद्यार्थिनींने छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. सदर स्पर्धकांचे विद्यार्थ्यांचे लेखन व चित्रकलेचे प्रदर्शन भरवण्या इतपत सुंदर होते, त्याबाबत स्पर्धकांबरोबरच त्यांचे पालकांचे व शिक्षकांचे देखील कौतुक करण्यात आले.  

     काही दिवसात सदर स्पर्धेचा निकाल जाहीर करून बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. स्पर्धेकरिता बैठक व्यवस्था व योग्य नियोजन  करण्यात आले होते. यावेळी गोपनीय  अंमलदार अविनाश पोवार, सुहास पोवार, सचिन जाधव, परीक्षक शालेय शिक्षक वर्ग , पालक, पोलीस मित्र यांचे बहुमोल सहकार्य लाभले. ही संकल्पना (अन्नपूर्णा सिंह)

   परि.सहा.पोलीस अधीक्षक

   करवीर पोलीस ठाणे यांची होती.

Post a Comment

0 Comments