Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

डोळ्यांच्या ड्रॉपचा तुटवडा असल्याने निंबोळी ट्यूबची मागणी वाढली.निंबोळी ट्यूबला आले अच्छे दिन.

 डोळ्यांच्या ड्रॉपचा तुटवडा असल्याने निंबोळी ट्यूबची मागणी वाढली.निंबोळी ट्यूबला आले अच्छे दिन.

मेडिकल स्टोरवर आय ड्रॉप मिळेना तर सरकारी दवाखान्यात मुलबक.

------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

रणजितसिंह ठाकुर 

रिसोड प्रतिनिधि

------------------------------------------

मागील काही दिवसा पासून सध्या सर्वत्र डोळे येण्याची साथ सुरु असून प्रत्येक घराला डोळ्याच्या आजाराने घेरले अश्यात एकाच वेळी डोळ्याचे आजार उद्भवल्याने डोळ्याला लागणारे आय ड्रॉपचा तुटवडा पडला अश्यात सध्या कित्येकांना आधार ठरला तो स्वस्तात मिळणारे निंबोळी ट्यूबचा. एका रुपयात रुग्ण बरा होतं आहे मात्र सध्या निंबोळी ट्यूबचा देखील तुटवडा पडलेला दिसून येत आहे.

संपूर्ण राज्यात एकाच वेळी डोळे येण्याचा विषाणू जण्य रोगाने ग्रासले. अश्यात प्रत्येक घरात रुग्ण आहेत सर्वच वयोगटातील लोकांना डोळे येण्याची साथ पसरली अश्यात मेडिकल स्टोरवरती असलेले अँटी ब्याटीक व स्टॉराईड हे घटक असलेले आय ड्रॉपचा तुटवडा निर्माण झाला.प्रत्येक घरात रुग्ण असल्याने त्याची मागणी वाढली तर ज्यांना तुटवडा निर्माण होण्याची भीती निर्माण झाली अश्या लोकांनी आय ड्रॉप खरेदी करून घेतले ज्याने सध्या आय ड्रॉपचा तुटवडा निर्माण झाला यावर एक उपाय म्हणून सर्वात जुना फार्मुला जो प्रत्येक घरी माहित होता आणि डोळे येण्या पासून बाळ जन्माला आल्यावर त्याच्या नाळाला लावण्या पर्यंत तर जखमेवर लावण्या साठी निंबोळी ट्यूब चा वापर होतं होता. मात्र मध्यंतरी त्याचा उपयोग कमी झाला आणि त्याचा विसर पडला.औषध विक्रेत्यांनी दिलेल्या माहिती नुसार पूर्वी आठवड्याला एक बॉटल निंबोळी ट्यूब लागायच्या आणि त्या फार स्वस्त होत्या सध्या एका रुपयाला दोन असून डोळे येण्याच्या आजारात त्याची खूप मागणी वाढली.अश्यात एका रुपयात दोन येणारे निंबोळी ट्यूब दिवसाला दोन ते तीन बॉटल लागत आहेत. मात्र त्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे.

सध्या डोळे येण्याची साथ सुरु आहे ज्या मध्ये आय ड्रॉप हवाच असे नाही त्या साठी प्रतिजैविके असलेले औषध (अँटी ब्याटीक ) हे उपयुक्त असून त्याने सुद्धा आराम मिळतो आय ड्रॉप हा जास्त प्रमाणात इन्फेकशन झाल्यावर वापरा सध्या सरकारी दवाखान्यात प्रती जैविक औषधी (अँटी ब्याटीक ) औषधीचा साठा मोठ्या प्रमाणात आहे डोळे आणि हात स्वच्छ ठेवल्याने इन्फेकशन कमी होतो.-

डॉ रामहरी बेले 

तालुका वैद्यकीय अधिकारी रिसोड.

Post a Comment

0 Comments