Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जयसिंगपूर' चे बिहार तर होत नाही ना ?

 'जयसिंगपूर' चे बिहार तर होत नाही ना ?

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

जयसिंगपूर /प्रतिनिधी 

नामदेव भोसले.

-----------------------------------

 पोलीस कर्मचाऱ्यांच्या आदेशामुळे जयसिंगपूर नगरीत मटका जोरात ? 

जयसिंगपूर शिरोळ तालुक्यातील शांत, संयमी आणि व्यापाऱ्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयसिंगपूर शहराची ओळख पुसत चालली आहे. अलीकडच्या काळात मोटारसायकल व मोबाईल चोऱ्या यासह अन्य गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मटका, जुगार, गांजा, अवैद्य दारू विक्री राजरोस सुरू आहेत. हे अवैध धंदे मोडून काढण्याची आवश्यकता असताना नुकताच सराफ काका पुतण्याच्या अपहरणामुळे शहराच्या सुरक्षेतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

    जयसिंगपूर पोलीस ठाणे अंतर्गत उदगाव, दानोळी, कोथळी, चिपरी उमळवाड, जैनापूर, कवठेसार, निमशिरगाव, तमदलगे, कोंडिग्रे यासह संभाजीपुर या गावांचा समावेश असून दोन ते तीन गावात गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. गेल्या रविवारी जयसिंगपूर शहरात फिल्मी स्टाईलने सराफ व्यापारी काका पुतण्याचे अपहरणाचे थरारनाट्य घडले होते. जयसिंगपूर शहरात प्रथमच घडलेल्या या प्रकाराने शहरातील व्यापारी भीतीच्या छत्रशाळेत आली आहेत. या प्रकरणातील पोलिसांच्या हाती लागलेले आठ संशयित स्थानिक आणि सराईत गुन्हेगारांचा समावेश असल्याने व्यापारांच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

     शहरात सातत्याने बसस्थानकात आणि पहाटे आणि रात्रीच्या वेळी फिरावयास जाणाऱ्या महिलांचे दागिने हिसडा मारून नेण्याचे प्रकार पाडले वाढले आहेत. रविवार गुरुवार च्या आठवडी बाजारामध्ये मोबाईल व अन्य साहित्य, मोटारसायकल चोरीच्या घटना घडत आहेत.

महिन्याभरापूर्वी शहरातील मध्यवस्तीतील भरदिवसा बंगला फोडला होता. रात्रीच्या वेळी घरफोडी सह पतसंस्थाही चोरट्यानी फोडल्या आहेत. ह्या घटना सुरू असतानाच मटका व जुगार, रात्रीच्या वेळी धाबे -हॉटेलवर राजरोस पणे अवैद्य दारू विक्री सुरू आहे. काही भागात गांजा विक्री ही मोठ्या प्रमाणात फोपापोली आहे.अशातच शांत संयमी शहराच्या इतिहासात प्रथमच सराप व्यापाऱ्यांच्या अपहरण प्रकरणामुळे शहरात सर्वांच्या सुरक्षेतेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.


चौकट..........


मागील काही वर्षातील तालुक्यातील गुन्हाची आकडेवारी पाहिली तर वाढ झालेली दिसेल याउलट पोलीस प्रशासनाकडून कारवाई मात्र म्हणावी तशी नसल्याने जयसिंगपूर,शिरोळ,कुरुंदवाड पोलिसाचे कोणालाच भय राहिलेले नाही. तालुक्यात राजरोस खासगी सावकारी सुरु आहे. गावोगावी मटका जोरात सुरू आहे, पण हप्तेबाजीमुळे कारवाई शून्य आहे. मुलामध्ये व्यसनाधिनता वाढत चालली आहे. छोटी घटना घडली तरी अरेला का रे चा आवाज ऐकू येतोय जयसिंगपूरच्यायात्रेवेळी सिद्धेश्वर यात्रेमध्ये तरुणाई बिनधास्त दादागिरी करत होती. त्यावेळी पोलीस केवळ बग्याची भूमिका घेतल्याचे जयसिंगपूरकरानी अनुभवले. कुठेही निर्भया पथक दिसत नाही. शहरासह गावातून येणाऱ्या बसेसमध्ये रोड रोमिओ बस रोमीओगिरी सुरु आहे. पण त्याचे फारसे कोणाला काहीच वाटत नाही. पोलीस ठाण्यात गले की केवळ एन. सी. एफआयआर फाटण्याशिवाय चाकोरी बाहेर जावून काम करण्याची येथील पोलिसांची अजिबात मानसिकता नाही. यामुळे गुन्हेगारी वाढत चालल्याचे दिसुन येत

 काही पोलीस कर्मचारी व पोलीस अधिकारी यांच्या संगनमताने रेशमा भाभीचा जयसिंगपूर नगरीत "मटका "खुलेआम जयसिंगपूर व तालुक्यात राजरोस खासगी सावकारी : गावोगावी मटका जोरात : हप्ते बाजीमुळे कारवाई शून्य

Post a Comment

0 Comments