Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

करंदी मधील रस्ता अडवणाऱ्यावर कारवाई करून आम्हास न्याय द्या नाहीतर आंदोलन करणार : किरण बगाडे.

 करंदी मधील रस्ता अडवणाऱ्यावर कारवाई करून आम्हास न्याय द्या नाहीतर आंदोलन करणार : किरण बगाडे.

--------------------------------------------------------------------------------

--------------------------------------------------------------------------------

मा.तहसिलदार सो व मा.गटविकास अधिकारी पं.समिती मेढा यांना RPI (A) च्या व करंदी ग्रामस्थ यांच्या वतीने निवेदन सादर.

मौजे करंदी ता. जावली मधील सर्व्हे नं.42 मध्ये आमच्या गावठाण  हद्दीमध्ये अतिक्रमण व  वाहिवाटीचा रस्ता बंद करत असून आमच्या हद्दीत पत्र्याचे शेड शंकर रावसो शिर्के ,गिरीश शिवाजी भिलारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करा .

उपरोक्त वरील विषयानुसार मौजे करंदी ता.जावली येथील आमच्या अशा सर्व्हे नं.42,43,44, मध्ये आमच्या गावठाण  80 अ,ब,क हद्दीमध्ये अतिक्रमण व  वाहिवाटीचा रस्ता बंद करत असून आमच्यामध्ये संबंधित व्यक्तीने बेकायदेशीर व अनधिकृत रित्या माझी जागा म्हणत पत्र्याचे शेड टाकून आमच्या जागेत अतिक्रमण करून आमच्यावर अन्याय केला आहे सदर व्यक्ती हा आमच्यावर नेहमी दमदाटी करत  असून आमच्यावर नेहमी वादावादी करत असतो असतो त्याच व्यक्तीचे त्या ठिकाणी आमचा वहीवाटीचा रस्ता आमचा बंद केला आहे सदर व्यक्तीकडे  कोणतेही स्वतःचे कागदपत्रे  नसतानाही आमच्या सामाईक क्षेत्रामध्ये सदर व्यक्ती आमच्यावर दमदाटी करून बेकायदेशीर रित्या पत्र्याचे शेड मारत आहे तरी तात्काळ शेड हटवून आम्हास रस्ता मोकळा करावा आम्हाला योग्य तो न्याय मिळावा अन्यथा 

पूर्ण कुटुंबासहित आम्ही आपल्या कार्यालयासमोर  04/09/20230 तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा किरण बगाडे यांनी दिला .

Post a Comment

0 Comments