Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

टेरिटरी " वाघाच्या शोधाचा थरारक प्रवास " टेरिटरी " १ सप्टेंबरला होणार प्रदर्शित.

टेरिटरी " वाघाच्या शोधाचा थरारक प्रवास " टेरिटरी " १ सप्टेंबरला होणार प्रदर्शित.

------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------

 वाघाच्या शोधाचा थरारक प्रवास मांडणारा " टेरिटरी " याची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. प्रदर्शित विदर्भातील जंगलाच्या आणि वाघाच्या शोधाची थरारक कहाणी उलगडणाऱ्या ' टेरिटरी ' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला . सचिन श्रीराम दिग्दर्शित या चित्रपटात संदीप कुलकर्णी , किशोर कदम अशी तगडी स्टारकास्ट असून १ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे . नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला . निर्माते श्रीराम मुल्लेमवार यांच्या डिव्हाईन टच प्रॉडक्शन्सतर्फे ' टेरिटरी ' हा चित्रपट प्रस्तुत करण्यात आला आहे . लेखक - दिग्दर्शक सचिन श्रीराम यांनी फिलिपिन्समधील इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजनमधून चित्रपटाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आहे . बऱ्याच चित्रपटांसाठी सहायक म्हणून काम केल्यानंतर आता ते टेरिटरी या चित्रपटातून पदार्पण करत आहेत . कलकत्ता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल , गंगटोक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल , ग्रीन ॲकॅडमी अॅवॉर्ड्स , गोल्ड फर्न फिल्म अॅवॉर्ड्स अशा विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये चित्रपट दाखवला गेला आहे , पारितोषिकप्राप्त ठरला आहे . कृष्णा सोरेन यांनी चित्रपटाचं छायांकन , मयूर हरदास यांनी संकलन , महावीर सब्बनवार यांनी ध्वनि आरेखन , यश पगारे यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे . यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील जंगलात नरभक्षक झालेला वाघ जंगलातून गायब होतो , या नरभक्षक वाघाला मारण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी दिली जाते आणि एक थरारक शोध सुरू होतो . चित्रपटाच्या टीजरनं आधीच उत्कंठा वाढवली आहे . त्यात आता ट्रेलर लाँच करण्यात आला असून , चित्रपट कथानकासह सर्वच तांत्रिक बाजूंवर सक्षम असल्याचं दिसतं . विशेषतः सचिन मुल्लेमवार यांचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचं जाणवतंही नाही इतकं सफाईदार काम झाल्याचं ट्रेलरमधून स्पष्ट दिसतं . छायांकन , वेगवान संकलन आणि पार्श्वसंगीतामुळे हा ट्रेलर विलक्षण परिणामकारक झाला आहे . त्यामुळे चित्रपटाविषयीचे कुतूहल आता अधिकच वाढले आहे . यावेळीअभिनेते संदीप कुलक

Post a Comment

0 Comments