Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सचिन जंगम यांची शाळा व्यवस्थापन समिती ओझरे -अध्यक्षपदी निवड.

 सचिन जंगम यांची शाळा व्यवस्थापन समिती ओझरे -अध्यक्षपदी निवड.

 भणंग :- सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी  पार पडलेल्या ओझरे शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती सभेमध्ये सर्वानुमते श्री सचिन शांताराम जंगम यांची बिनविरोध नवनियुक्त अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. स्वच्छ सुंदर गुणवत्ता व पूर्ण शाळा, राष्ट्रीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार, जिल्हास्तरीय बालनाट्य स्पर्धा, आयएसओ शाळा ,विविध सांस्कृतिक स्पर्धा यामध्ये सदस्यपदी काम करत असताना सचिन जंगम यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे. आज अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर यापुढे देखील शालेय उन्नतीसाठी  काम करणार असल्याचे तसेच शाळेच्या विविध अडचणी सोडवण्यामध्ये प्रामुख्याने सर्व शाळा व्यवस्थापन समिती  लक्ष देणार असल्याचे सचिन जंगम यांनी सांगितले. आजच्या या सभेसाठी अध्यक्ष दत्तात्रय ज्ञानदेव लकडे, उपाध्यक्ष-दर्शना सचिन कदम, माजी अध्यक्ष-विवेक मर्ढेकर, निलेश जवळ,जोगेंद्र मर्ढेकर,माजी ग्रामपंचायत सदस्य-शिल्पाताई सावंत,अर्जुन मोरे,  पूजा सरडे, रेश्माताई मर्ढेकर,आरती चव्हाण,अर्चना जंगम मुख्याध्यापक बळवंत पाडळे उपशिक्षक का संगीता मस्के मॅडम नेहा जाधव मॅडम अण्णासाहेब दिघे सर उपस्थित होते. सर्वांनी नवीन अध्यक्ष सचिन जंगम यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यकालास शुभेच्छा दिल्या

Post a Comment

0 Comments