Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पिंपळा येथे आदिवासी माता भगिनी मध्ये गोपाल पाटील राऊत यांचा वाढदिवस साजरा.

 पिंपळा येथे आदिवासी माता भगिनी मध्ये गोपाल पाटील राऊत यांचा वाढदिवस साजरा.

 मालेगाव 28 ऑगस्ट तालुक्यातील पिंपळा येथे गोपाल पाटील राऊत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आदिवासी माता-भगिनीमध्ये गोपाल पाटील राऊत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला माजी पंचायत समिती सदस्य गोपाल पाटील राऊत यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने तालुका मध्ये साजरा होत असून पिंपळा येथे आदिवासी माता-भगिनी मध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला.

 याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच संतोष डंगारे सत्कारमूर्ती गोपाल पाटील राऊत प्रमुख उपस्थिती पंचायत समिती सदस्य जगदेवराव ढंगारे पोलीस पाटील समाधान गुडदे उत्तम देवळे जगदीश गुडदे प्रकाश देवळे कैलास पाटे अशा असंख्य गावकऱ्याची माता-भगिनींची उपस्थिती होती या प्रसंगी प्रास्ताविक समाधान गुडदे यांनी केले असून जगदेव डोंगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी सांगितले की गोपाल पाटील यांच्यासारखा निस्वार्थ नेता तालुक्यामध्ये कोणताही नसून त्यांनी कुठल्याही स्वार्थापोटी आपल्या गावामध्ये साडे चोळी वाटपाचा कार्यक्रम घेतला नाही डोक्यामध्ये 15 गावांमध्ये पंधराशे चोळीचे वाटप करत आहेत आपले मनोगत व्यक्त करताना गोपाल पाटील राऊत यांनी सांगितले की मी माझ्या परीने एक खारीचा वाटा म्हणून मी माझ्या माता बहिणींना एक रक्षाबंधनानिमित्त छोटीशी साडी चोळी भेट देत असून आपण ते स्वीकार करावा व भविष्यात केव्हाही एक भाऊ म्हणून मुलगा म्हणून मला आवाज द्या मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही दिली आणि या गावावर माझं भरपूर प्रेम आहे आणि असंच शेवटपर्यंत राहील असे त्यांनी सांगितले आभार समाधान गुडदे यांनी मानले याप्रसंगी गावकऱ्यांमध्ये माता-भगिनीमध्ये एकच उत्साह संचारला होता

Post a Comment

0 Comments