Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार.एकावर गुन्हा दाखल.

  अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार.एकावर गुन्हा दाखल.गांधीनगर:-  व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ कॉलिंग चे स्क्रीन शॉट सगळ्यांना दाखवतो अशी भीती घालून  अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सौरव पोतदार व.व.23 रा. गडमुडशिंगी ता करवीर याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी पीडित अल्पवयीन मुलगी चिंचवाड येथे दहावीच्या क्लासला जात होती. त्यावेळी संशयीत आरोपीने तिला 2022 ते एप्रिल 2023 पर्यंत तुझे  व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ कॉलचे स्क्रीन शॉट व्हायरल करीन अशी भीती दाखवत वेळोवेळी शेतात आणि दवाखान्यामध्ये लैंगिक अत्याचार केले. अशी फिर्याद पीडित अल्पवयीन मुलींने गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली. यावरून संशयित सौरव पोतदार याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात करत आहेत.

Post a Comment

0 Comments