Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

प्रादेशिक व्यवस्थापक एस.एल.‌मांजरे यांची लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयास भेट.

 प्रादेशिक व्यवस्थापक एस.एल.‌मांजरे यांची लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयास भेट.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक एस.एल. मांजरे यांनी सातारा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या सातारा येथील कार्यालयास वसुली अभियान व कार्यालयीन कामकाज अंतर्गत भेट दिली. प्रारंभी ‌मांजरेसाहेब‌ स्वागत सातारा जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र इंगळे यांनी फुलझाड देवून केले. ‌सदर प्रसंगी पुसेसावळी येथील ‌ लाभार्थी ‌  महेश होळकर यांना  अनुदान योजना अंतर्गत धनादेश देण्यात आला. प्रादेशिक व्यवस्थापक मांजरे यांनी कार्यालयीन कामकाज व वसुली कामकाजाचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले. सदर प्रसंगी पुणे प्रादेशिक कार्यालय येथील लेखापाल विठ्ठल वायदंडे व सुशांत घनवट तसेच सातारा जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र इंगळे, कार्यालय लिपिक जयवंतराव वायदंडे व लाभार्थी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments