Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

खेड ता. सातारा ग्रामपंचायत बरखास्त करून फौजदारी गुन्हा दाखल करा.

 खेड ता. सातारा ग्रामपंचायत बरखास्त करून फौजदारी गुन्हा दाखल करा.



-------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------

मुख्य पुणे आयुक्त यांना निवेदन सादर

अन्यथा 15 ऑगस्ट रोजी आंदोलन करणार:दादासाहेब  ओव्हाळ 

 ग्राम स्तरावरील ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता व ग्रामीण आरोग्य समिती यांच्या विलीनीकरण या विषयावरून ग्राम स्तरावर ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती करणे याबाबत शासन निर्णय झाला त्यामध्ये शासन अधिनियम 23 मध्ये गाव पातळीवरील गळ्यातील लोकांचे विशेष ज्ञान व प्रताप याकरता ग्रामविकास समित्या करण्याचे अधिकार नवीन पंचायत गतीत झाल्यास नवीन पंचायत गतीत झाल्यापासून 45 दिवसाच्या आत ग्रामविकास समित्या पुनर्गठीत करण्यात याव्या अशा प्रकारचा आदेश असतानाही खेड ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच सदस्य यांनी हुकूमशाही पद्धतीने शासनाचे सर्व आदेशाला केराची टोकरी दाखवली आहे तरी संबंधितांनी ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग ६डिसेंबर २००६ शासन निर्णय क्रमांक ग्रापापु१००६/प्र.क्र.३६९/पापु-०७ मुंबई 

ग्रामीण जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी पुरवणे कुपोषण व आरोग्य विषयक कार्यक्रम हे एकामेकांशी निगडित असल्याने ग्राम स्तरावरून त्याची अंमलबजावणी करताना या विविध कार्यक्रमांमध्ये समन्वय असणं आवश्यक असल्याने या कामासाठी ग्राम स्तरावर वेगवेगळ्या समित्या गठीत न करता हे काम ग्राम स्तरावरील एकाच समितीकडून करून घेणे आवश्यक असल्याने ग्राम स्तरावरील ग्राम आरोग्य समितीचे विलीनीकरण ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीमध्ये करून या समितीचे नामाभीधान ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती असे करण्याचे व ग्रामीण पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य व पोषण हे विषय या समितीच्या अखत्या आणण्याची  बाब शासनाच्या विचाराधीन होती.

मुद्दा क्रमांक दोन

नोव्हेंबर पासून नवीन पंचायती गठित झाले पासून ग्रामपंचायतच्या आर्थिक व्यवहाराची जाणीवपूर्वक अनियमिता करण्यात येत आहे त्यामध्ये घंटागाडी अवैध्य रित्या कसल्याही प्रकारचे टेंडर न काढता सुरू ठेवल्या आहेत तसेच टी सी एल खरेदी इलेक्ट्रिक साहित्य खरेदी, नळ पाणीपुरवठा साहित्य खरेदी, स्वच्छता कामगार साठी साहित्य खरेदी इत्यादी लाखो रुपयांची खरेदी ही सरपंच ,उपसरपंच, सचिव ग्रामपंचायत कर्मचारी यांनी खरेदी केली आहे त्याची कुठल्याही प्रकारची निविदा काढली नाही तसेच जाहिरात दिलेली नाही तरीसुद्धा ग्रामपंचायत मध्ये झालेल्या अनियमितता गैरव्यवहार झालेले दिसून येत आहे. त्यास सरपंच उपसरपंच सचिव व ग्रामपंचायत कर्मचारी जबाबदार आहेत. त्यांच्यावरती तात्काळ फौजदार गुन्हा दाखल करण्यात यावा. परिपत्रक ग्रामविकास विभाग क्रमांक व्ही पी एम 2016 / प्र क्र 253 /पंरा-3 तीन 4 जानेवारी 2017 असे परिपत्रक आहे

 मुद्दा क्रमांक तीन 

अवैधरित्या कुठलीही जाहिरात व पात्रता न पाहता कामगार भरती केली त्यामध्ये पाणीपुरवठा कर्मचारी, क्लार्क, भरती ड्रायव्हर भरती इत्यादी प्रक्रिया ही चुकीच्या पद्धतीने राबवली तसेच पूर्वीच्या क्लार्क,पाणीपुरवठा कर्मचारी यांना कोणतेही कारण न देता कामावरून कमी केले याचीही सखोल चौकशी होणे. 

 मुद्दा क्रमांक चार 

 नवीन पंचायत गठीत झाल्यापासून सरपंच व सचिव व संबंधित शाखा अभियंता यांनी जिल्हा परिषद 15वित्त आयोगची बांधकाम  कामे तसेच ग्रामपंचायत 15 वित्त आयोग व ग्रामनिधीच्या केलेल्या सर्व कामांची योग्य ती चौकशी करण्यात यावी संबंधितांनी केलेल्या कामांमध्ये ग्राम स्तरावरील 15 वित्त आयोगाच्या कामांमध्ये अनेक प्रकारची कामे ही बोगस व आपारमेंट भागांमध्ये बिल्डरांचे हित व तसेच मंगल कार्यालय मालकांचे हित जोपासत खाजगी जागेत कामे केलेली आहेत तसेच जिल्हा परिषद 15 वित्त आयोगातील काम हे प्रतापसिंह नगर मध्ये मंजूर असताना इतरत्र दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच डिफेन्स कॉलनी मध्ये करण्यात आलेले आहे त्यानंतर 15 वित्त आयोगातील प्रताप सिंह नगर येथील समाज मंदिर दुरुस्तीच्या कामाची रक्कम व एमबी हे त्रिस्थ संस्थेकडून तपासणी गरजेचे आहे इत्यादी बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार करून शासनाच्या आदेशाची पायमल्ली करणे तसेच आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमित्ता ठेवणे व बोगस कामे करून दिले काढणे या नियम व अटींच्या व कलमानखाली संबंधितांना खेड ग्रामपंचायत बडतर्फ करून फौजदारी खटला सुरू करण्यात यावा  अन्यथा १५ ऑगस्ट २०२३ रोजी पाच स्थानिक प्रतापसिंह नगर येथील कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन कार्यकर्ते आत्मदहन करणार आहोत होणाऱ्या सर्वस्वी परिणामाची जबाबदारी ही शासन प्रशासनाची राहील

माहितीसाठी प्रत

 मा. जिल्हाधिकारी सो

 सातारा

मा.मुख्य कार्यकारी सो अधिकारी जिल्हा परिषद सातारा

मा पोलीस अधीक्षक सो

सातारा जिल्हा पोलीस प्रमुख

मा राज्यपाल सो

महाराष्ट्र राज्य

मा. ग्रामविकास मंत्री सो, महाराष्ट्र राज्य

मा. दीपक भाऊ निकाळजे

राष्ट्रीय अध्यक्ष आरपीआय.

Post a Comment

0 Comments