Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सातारा येथील पोवई नाका येथील शिवतीर्थाच्या सुशोभीकरणाच्या कामास सुरुवात.

 सातारा येथील पोवई नाका येथील शिवतीर्थाच्या सुशोभीकरणाच्या कामास सुरुवात.

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा विभाग प्रतिनिधी 

अमर इंदलकर.

-----------------------------------

सातारा: येथील पोवई नाका येथील शिवतीर्थाच्या सुशोभीकरणास प्रारंभ झाला असून हे काम सोनाली बांधकाम चे महेश साठे हे करत आहेत. ह्या कामावर देखरेख अभियंते सचिन बांगर करत असून, पालिकेचे मुख्य अभियंता दिलीप चिदरे यांच्या अधीपत्याखाली हे काम करण्यात येत आहे. शिवतीर्थ परिसरात बाहेरून दगडी बांधकाम केले जात असून आतून चौथरा करण्यात येणार आहे. अशी माहिती सातारा पालिकेच्या बांधकाम विभागातून देण्यात आली आहे. तोफेसह असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या पुतळ्यास बांधून जवळ- जवळ एकसष्ठ वर्षे झाली असून संपूर्ण सातारकरांना जणू संघर्षाची प्रेरणा हे शिवतीर्थ देत असते. पुणे येथील प्रसिद्ध शिल्पकार बी.आर. खेडकर ह्यांनी हा अभूतपूर्व पुतळा तयार केला होता. सुशोभीकरणाचे बुधवार पासून सुरु झालेल्या कामाविषयी सातारकरांच्यात समाधान दिसत असून, पूर्ण काम झाल्यावर कसे दृश्य असेल हयाविषयी उत्सुकता देखील आहे

Post a Comment

0 Comments