Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली येथे ट्रक आणि मोटरसायकल अपघातात राधानगरीचा एक जण ठार.

 राधानगरी तालुक्यातील  ठिकपुर्ली येथे ट्रक आणि मोटरसायकल अपघातात राधानगरीचा एक जण ठार.

राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली येथे ट्रक आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात राधानगरी येथील चंद्रकांत गुंडू पाटील या  57 वर्षाच्या शेतकऱ्याचा  जागीच मृत्यू झाला   ठिकपुर्ली हुन बारडवाडी कडे पशुखाद्य घेऊन चाललेला ट्रकची  ठोकर सायकल ला धडक लागल्याने मोटर सायकल स्वार रस्त्यावरच पडला आणि जागीच ठार झाला.

 ठिकपुर्ली हुन बारडवाडी कडे पशुखाद्य घेऊन  ट्रक चालला होता तर बारडवाडी कडून  मोटार सायकल वरून राधानगर येथील चंद्रकांत गुंडू पाटील  हे  ठिकपुर्ली गावाकडे जात होते. गावाजवळ ट्रक चालकाची मोटर सायकल चालकाला धडक लागली आणि ट्रकच्या  चाकात पाटलांचा पाय गेला तर रस्त्यावर डोकं आपटलं यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. काल दुपारी ही घटना घडली दरम्यान घटनास्थळी मोठा आवाज झाल्याने शेजारील नागरिकांनी धाव घेतली असता अपघात झाल्याचे निदर्शनास आले. तर ट्रक चालक पळून जात असताना ग्रामस्थांनी पकडून त्याला ठेवलं.तर पोलीस पाटील सीमा कांबळे यांनी राधानगरी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. तात्काळ घटनास्थळी राधानगरी चे पोलीस दाखल झालेत. अपघाताचा पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. मयत पाटील याचा मृतदेह शव विच्छेदनसाठी  सोळाकुर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला अपघात स्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली तर रस्त्यावर रक्ताचे सडा वाहत  होता. पाटील हे राधानगरी हुन ठिकपुरली येथील नातेवाईकांना बोलवण्यासाठी  चालले होते याच दरम्यान हा अपघात झाला अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments