Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

निलेशा कंप्युटर्स मेढा तर्फे ग्रामसभांमध्ये 'सारथी' योजनांचे वाचन..

 निलेशा कंप्युटर्स मेढा तर्फे ग्रामसभांमध्ये 'सारथी' योजनांचे वाचन..

भणंग  - छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी ही महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी - मराठा या लक्षित गटासाठी  सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाकरिता विविध योजना राबवित आहे. या योजनांची माहिती गावपातळीवर तळागाळापर्यंत पोहोचावी या हेतूने १५ ऑगस्ट - स्वातंत्र्यदिनी जावली तालुक्यातील विविध गावांमध्ये होणाऱ्या ग्रामसभांमध्ये सारथीच्या सर्व योजनांचे वाचन निलेशा कंप्युटर्स मेढा येथील प्रशिक्षणार्थी मार्फत केले गेले.

सारथी व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मार्फत राज्यभर सुरू असलेला सीएसएमएस - डीईईपी या डिप्लोमा कोर्सच्या जावली तालुक्यातील अधिकृत संगणक प्रशिक्षण केंद्र निलेशा कंप्युटर्स मेढा येथे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींची शासनामार्फत नियुक्ती करण्यात आली होती. डांगरेघर, करंजे, पिंपरी तर्फ मेढा, वागदरे, पूनवडी, केळघर आदी ग्रामपंचायतीमध्ये ध्वजवंदनानंतर झालेल्या ग्रामसभांमध्ये सुरुवातीस या योजनांचे वाचन करण्यात आले.

युवकांच्या करियर - नोकरीसाठी सतत प्रयत्नशील असणारे, विविध जॉब ओरिएंटेड कोर्सेस, सेमिनार आयोजित करून भरपूर सराव घेत अल्पावधीतच विद्यार्थ्यांसह पालकांच्या पसंतीस उतरलेले जावली तालुक्यातील शासनमान्य संगणक प्रशिक्षण केंद्र म्हणजेच निलेशा कंप्युटर्स मेढा येथे १८ ते ४५ वयोगटातील उमेदवाराकरीता सारथीमार्फत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून सातारा जिल्ह्यातील एमकेसीएल निवडक केंद्रांमधून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना मोफत स्पोकन इंग्लिश आणि बेसिक आयटी हे दोन अभ्यासक्रम शिकविल्यानंतर पुढील दोन मोड्यूल हे प्रशिक्षणार्थीने स्वतःच्या करियर पसंतीनुसार अकाउंटिंग, डेटा मॅनेजमेंट, एक्सेल, प्रोग्रामिंग,वेब डिझायनिंग, डीटीपी, हार्डवेअर नेटवर्किंग, रिटेल मॅनेजमेंट, इत्यादी कोर्समधून निवडायचे आहेत. तरी तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन निलेशा कंप्युटर्स मेढा चे संचालक श्री. निलेश धनावडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments