Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सज्जनगढ परिसरात जखमी आवस्थेत बिबट्याचे पिल्लू वनविभाग जखमी पिल्याच्या शोधात.

 सज्जनगढ परिसरात जखमी आवस्थेत बिबट्याचे पिल्लू वनविभाग जखमी पिल्याच्या शोधात. 

सज्जनगड: रस्त्यावर बिबट्याचा अपघात :रस्त्यावर रक्त; जखमी बिबट्या वन विभागाकडून शोध सुरू

सज्जनगड चाळकेवाडी रस्त्यावर बिबट्या व त्याचे पिल्लू रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक बसल्याने बिबट्याच्या पिल्लाला जबर धक्का बसल्याने पिल्लू जखमी झाले असून सदर बिबट्या व त्याची पिल्ले सज्जनगडच्या जंगल परिसरात निघून गेली आहेत. घटनास्थळी रस्त्यावर रक्त सांडले असून या पिल्लांचा शोध वन विभागाच्या वतीने सुरू आहे.

सविस्तर वृत्त असे की आज सकाळी सुमारे नऊच्या दरम्यान सज्जनगड चाळकेवाडी रस्त्यावर सज्जनगड फाट्याच्या अलीकडे गर्द झाडी जवळ बिबट्या व त्याची पिल्ले रस्ता ओलांडत होती हे वाहनधारकांच्या लक्षात आल्यावर अनेक वाहनांची गती कमी झाली मात्र याचवेळी या रस्त्याच्या कडेला एक बिबट्याचे पिल्लू बसले होते मात्र हे पिल्लू वाहने जात असतानाही रस्ता ओलांडत नव्हते यावेळी काही वाहनधारकांनी वाहन थांबवले तर घटनास्थळी रक्त सांडले होते  या बिबट्याला मार लागल्याने हा बिबट्या संथ  गतीने हालचाल करीत असल्याचे आढळले. बिबट्या रस्ता ओलांडताना तसेच कडेला असताना काहींनी त्याची छायाचित्रेही टिपलि.

रस्त्याच्या कडेलाच बिबट्याचे पिल्लू आढळल्याचे काही नागरिकांनी वनविभागाला कळवले .वन विभागाचे परळी वन परिमंडळ अधिकारीअरुण सोळंकी, रेस्क्यू टीम कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन या बिबट्यांच्या पिल्लांचा शोध सुरू केला आहे मात्र दुपारी उशिरापर्यंत काही हाती लागले नव्हते. सज्जनगड परिसरात वारंवार बिबट्या त्याची पिल्ले यांच दर्शन होत असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments