Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

गारगोटी आगार मार्फत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बस स्थानक स्वच्छता अभियान आगाप्रमुख परशुराम नकाते.

 गारगोटी आगार मार्फत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बस स्थानक स्वच्छता अभियान आगाप्रमुख     परशुराम नकाते.

गारगोटी आगारात हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बस स्थानक स्वच्छता अभियान राबवण्यात आली आहे.  अपघात विरहित सुरक्षित सेवा केलेल्या चालकांचा तसेच उत्कृष्ट उत्पन्न आणलेल्या वाहकांचा आगार व्यवस्थापक परशुराम नकाते राज्य परिवहन गारगोटी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात कर्मचारी तसेच प्रवासी उपस्थित होते महामंडळ स्तरावर हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बसस्थानक स्वच्छता अभियान राबवले जात असून महामंडळ स्तरावर तसेच प्रादेशिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बसस्थानकास रोख रक्कम व मानचिन्ह सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे या अनुषंगाने गारगोटी बसस्थानकाने स्वच्छता अभियान स्पर्धेत भाग घेतला असून त्या पद्धतीने कार्यवाही चालू केली आहे लोकसहभागातून गारगोटीबस स्थानकावरील भिंतींना रंग रंगोटी करताना स्थानिक पर्यटन स्थळे भौगोलिक ठिकाणी यांच्या माहितीसह सामाजिक प्रबोधनात्मक घोषवाक्य ही रंगचित्रे काढण्यात आली. बस स्थानकावर प्रवासी संघटनेकडून देण्यात आलेल्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. साई कॅम्पुटर यांच्या सौजन्याने फलट वरती मार्ग फलाट डिजिटल नावे लावण्यात आली. राज्य कर्मचाऱ्यांच्या सहभागातून शोभिवंत कुंड्या व झाडे लावण्यात आली. युवा फाउंडेशन तर्फे गारगोटी आगारावर कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिरे भरण्यात आली बस स्थानकावरून नियमित स्वच्छता करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. प्रवासासाठी वेळापत्रक व महामंडळतर्फे देण्यात येणाऱ्या विविध सवलतेचे डिजिटल स्वरूपात माहिती लावण्यात आली अशी माहिती आगारप्रमुख परशुराम नकाते यांनी सांगितली यावेळी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक अनिकेत चौगुले स्थानक प्रमुख पूजा घाटगे ,वाहतूक निरीक्षक प्रसाद पाटील ,प्रमुख कारागीर भिकाजी कोळी,आदी कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments