जयसिंगपूर शहरात रोड रोमिओ ची हवा.

 जयसिंगपूर शहरात  रोड रोमिओ ची हवा.

------------------------------------------------

जयसिंगपूर :प्रतिनिधी

नामदेव  भोसले .

-----------------------------------------------

चाय बर कॅफेमध्येअल्पवयीन मुला मुलींचा रोमान्स रोखण्यासाठी.

निर्भया पथक कॅफेची चौकशी करण्याची गरज.

जयसिंगपूर शहराला शिक्षणाचे माहेरघर मानले जाते शाहू महाराजांनी बसवलेल्या जयसिंगपूर शहरांमध्ये अनेक शाळा कॉलेजेस तसे क्लासेस  आहेत शाळा कॉलेजेस मधील मुलींना येता जाता रस्त्यावर रोड रोमियोंचा सामना करावा लागतो विविध शैक्षणिक संस्था तसेच कोचिंग क्लासेस परिसरात विद्यार्थिनींचा पाठलाग करून छेड काढण्याचे प्रकार वाढले आहेत त्यामुळे मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे कशाला नादी का लागायचे असे म्हणत विद्यार्थी पालक शांत बसत असल्यामुळे टवाळखोरांची हिम्मत वाढत आहे रस्त्यावरून येता जाता मुलींची छेड काढली जाते व त्यांना मोबाईल नंबर मागितला जातो हात वारे करून इशारा केला जातो कॅफे मध्ये किंवा रस्त्यावरून मुलींसोबत कोणत्याही कारणावरून मोबाईल नंबर मागितले जातात त्यांच्याशी मैत्री करून प्रेमात पाडून त्यांच्याशी अनैतिक संबंध ठेवले जातात व्हिडिओ फोटो काढून त्यांना अनैतिक संबंधाची मागणी केली जात आहे मुली समाज आई-वडिलांच्या भीतीमुळे हे सर्व सहन करतात शिरोळ तालुक्यामध्ये अशा कित्येक मुली व महिला आहेत या अशा जाळ्यामध्ये अडकलेल्या आहेत कॅफेमध्ये तर अशा घटना किती घडलेल्या आहेत कॅफे शॉप हा मुली मुलांचा अड्डा झाला आहे तरी प्रशासनाचे यावर लक्ष कधी जाणार अनेक दिवसापासून टवाळकर तरुण क्लास शाळा कॉलेजेसच्या भागात उभे दिसतात क्लास मधील विद्यार्थिनींची मैत्री वाढवून ते विद्यार्थिनीशी लगट करण्याचा प्रयत्न करतात 18 वर्षाखालील रवाळखोरांकडे वाहन चालवण्याचा परवानाही नसतो  तरीही ते भरदाव वेगाने गाडी चालवत मुलींना कट मारत वेगाने सुसाट जातात त्यासाठी पोलिसांनी छेडछाड विरोधी पथक स्थापन करण्याची गरज आहे कारण आज शाळा कॉलेज क्लास मध्ये जाणाऱ्या मुली प्रचंड दहशती खाली आहेत हे काम पोलीस शैक्षणिक संस्थांनी पालकांनीही करायला हवे मुलींची छेडछानांचे प्रकार रोखण्यासाठी विशेष उपक्रम राबावेत प्रत्येक शाळा महाविद्यालय मध्ये तक्रारभेटी सीसीटीव्ही बसवण्याची गरज आहे या तक्रार पेटीमध्ये लैंगिक शोषण विरोधात विद्यार्थिनींनी तक्रारी कराव्यात या पेट्या या महिन्यातून किमान एकदा उघडून यावर उपाययोजना करायला हव्या हे करताना मुलींचे नाव गोपनीय राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे टवाळ खोरा वर कारवाई व्हायला हवी तसेच शाळा कॉलेजेस सुरू होण्याच्या वेळी निर्भया पथक रोड वरती असणे गरजेचे आहे

 दोन चाकी वाहन घेऊन भले मोठा संघटनेचा लोगो लावून .

निर्भयां पथकातील एका महिला कर्मचाऱ्याचा नाव सांगून .

खंडणी हप्तेकोर पोलीस स्टेशनच्या आवारात पडीक राहून पोलीस कर्मचारी व साहेबांचे नावे सांगून पैशाची मागणी करणारा ह्याचा बंदोबस्त लवकर व्हावा अशी नागरिकातुन चर्चेचा विषय आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.