Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्षश्री.युवराज(बाबा)काटकर व तालुका अध्यक्ष श्री.धनाजी आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांना निवेदन देण्यात आले.

 महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्षश्री.युवराज(बाबा)काटकर व तालुका अध्यक्ष श्री.धनाजी आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांना निवेदन देण्यात आले.

--------------------------------------------------------------------------------

--------------------------------------------------------------------------------

शाहूवाडी:आज दि.२९.८.२०२३ रोजी मलकापूर-मुंबई -मलकापूर ट्रॅव्हल्स मालक व चालक यांचे बेकायदेशीर तिकीट दर वाढ व रिटर्न ट्रॅव्हल्स सेवा न करणे संदर्भात माननीय पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सावंत्रे साहेब यांना निवेदन देण्यात आले. निव्वळ चाकरमानी जनतेला लुटण्याच्या उद्देशाने केलेल्या दरवाढीचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे जाहीर निषेध करत आहोत सदर प्रवासी वाहतूक संघटनेने येत्या दोन दिवसात चालू तिकीट दरात गणेश उत्सव काळामध्ये प्रवासी भाडे कायम करून व तिकीट दरवाढ थांबवून बुकिंग सुरु न केलेस शुक्रवार दिनांक १.९.२०२३ पासून मलकापूर मुंबई करिता जाणाऱ्या येणाऱ्या सर्व प्रवासी ट्रॅव्हल्स महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अडवल्या जातील अशा प्रकारचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावतीने देण्यात आला. याप्रसंगी मनसे तालुका सचिव श्री. प्रवीण कांबळे, श्री रोहीत जांभळे, उपविभाग अध्यक्ष श्री. शिवाजी फिरके वाहतूक सेना तालुका अध्यक्ष श्री. दीपक चांदणे, महिला सेना तालुका अध्यक्ष सौ. शीतल पाटील, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष श्री.अक्षय खेडेकर, श्री संदीप लाळे, श्री. सागर लाळे, संदीप सातोशे, धनाजी बनसोडे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments