मोटार सायकलवरून येऊन मोबाईलची जबरी चोरी कारनारे चार युवक अटक केले ..
मोटार सायकलवरून येऊन मोबाईलची जबरी चोरी कारनारे चार युवक अटक केले ..
सातारा:कोल्हापूर ते पुणे जाणाऱ्या हायवे वर सुजुकी शो रूम ते बॉंबे रेस्टॉरंट दरम्यान चार युवकांनी 10/08/2023 रोजी एका इसमास तो इसम गाडीचा पंक्चर काढायला गाडी हाताने ढकलत चाललेला आहे हे पाहून रात्रीच्या सुमारास त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्ती हिसकावून घेऊन ते चार जण पळून गेले होते. त्याबाबत सातारा पोलीस ठाणेत जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता. सदर आरोपी हे सातारा परिसरातून पळून गेले होते. गोपनीय विभाग त्यांच्या मागावर होते, आज रोजी ते सातारा परिसरात आले असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने सदर युवकांना ताब्यात घेणेत आले.सदर युवकांची नावे अनुक्रमे (1) करण ज्योतीराम चव्हाण राहणार डबेवाडी, ता. जि. सातारा (2) योगेश संजय कुऱ्हाडे वय 19वर्षे राहणार बोगदा मंगळवार तळे. ता. जि सातारा. (3) सिद्धार्थ सतीश महाडिक वय 20 वर्षे.राहणार आरे. ता.जि. सातारा.(4) अनुप चंद्रकांत जाधव. वय. 19 वर्षे. राहणार आरे-दरे.ता.जि. सातारा. सदर युवकांची कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केलेची कबुली दिली. सदर गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल व एकूण 5 मोबाईल असा एकूण 1,30.000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर ची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख. मा अप्पर पोलीस अधीक्षक सो. बापू बांगर. मा उप वि पो अधिकारी सो. किरण कुमार सूर्यवंशी, मा.वरिष्ठ पो. निरीक्षक श्री. धनंजय फडतरे.व पोलीस नीरीक्षक श्री महेंद्र जगताप यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रका्टीकरणाचे पोलीस उप निरीक्षक श्री. सुधीर मोरे.पो हवा. श्री निलेश यादव.व श्री. सुजीत भोसले. पो.ना. संतोष शेलार. निलेश जाधव. पंकज मोहिते. विक्रम माने. पो कॉ. विशाल धुमाळ. संतोष कचरे. गणेश घाडगे. सागर गायकवाड. मच्छिन्द्र माने. सुशांत कदम. यांनी कामगिरी बजावली.
Comments
Post a Comment