Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती राधानगरीच्या वतीने मोफत आंबा रोपे वाटप.

 महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती राधानगरीच्या वतीने मोफत आंबा रोपे वाटप.

------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कौलव प्रतिनिधी

संदीप कलिकते 

------------------------------------------

महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती ही संघटना फक्त शिक्षक आणि शिक्षणाच्या दृष्टीने काम करीत नसून ही संघटना सामाजिक भावनेतून आणि पर्यावरण रक्षणाच्या उदात्त हेतूने काम करीत आहे. असे प्रतिपादन कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर यांनी केले. शेतकऱ्यांना मोफत हापूस आंब्याची रोपे वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राधानगरीचे तालुका अध्यक्ष बाळासो पोवार होते.

    यावेळी कसबा तारळे ता. राधानगरी येथील ३०० शेतकऱ्यांना हापूस आंब्याची रोपे वाटप करण्यात आली. या कार्यक्रमास अशोक वागरे , गणपती मांडवकर , प्रभाकर कमळकर, आर.जी. पाटील , हरिदास वर्णे , प्रकाश कानकेकर , मधुकर मुसळे , शशि रानमाळे , सिध्दार्थ पाटील , गोविंद पाटील , सातापा कांबळे , बी एस पाटील , दिलीप मुंडे, चंदू बुजरे , शिवाजी चितळे , आर के पाटील, पंडीत चव्हाण आदी शिक्षक आणि शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक अशोक साबळे यांनी केले तर आभार शाहू चौगले यांनी मानले

Post a Comment

0 Comments