Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अण्णाभाऊ साठे उपेक्षितांचे दीपस्तंभ : तानाजी पाटील गडमुडशिंगी परिसरात अण्णाभाऊ साठेना अभिवादन.

 अण्णाभाऊ साठे उपेक्षितांचे दीपस्तंभ : तानाजी पाटील गडमुडशिंगी परिसरात अण्णाभाऊ साठेना अभिवादन.

--------------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार

--------------------------------------------------

गांधीनगर :-अखंड मानवतेची पूजा करणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शोषित, उपेक्षित समाजाचे दीपस्तंभ होते, असे प्रतिपादन श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक व गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील यांनी केले.

गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील छत्रपती शिवाजी चौक येथे 

अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती 

उत्सवास प्रारंभ करताना तानाजी पाटील बोलत होते.  अध्यक्षस्थानी आमदार तथा श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक होते. 

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर दोन बालकांनी अतिशय सुंदर भाषण केले. गडमुडशिंगी ग्रामपंचायतमध्येही प्रतिमा पूजन करण्यात आले.

संजय सातपुते यांनी स्वागत केले. माजी सरपंच जितेंद्र यशवंत यांनी प्रास्ताविक केले. सुधाकर पाटील, संजय दांगट, अमित माळी, रणजित राशिवडे , राघू धनवडे, अशोक दांगट, शेखर गोसावी आदी प्रमुख कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

गडमुडशिंगी येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना माजी आमदार अमल महाडिक, उपसरपंच तानाजी पाटील, अशोक दांगट आदि.

Post a Comment

0 Comments