काळम्मावाडी धरणाच्या पाच वक्राकार दरवाज्याच्या सांडव्यावरुन दूधगंगा नदी पात्रात विसर्ग.

 काळम्मावाडी धरणाच्या पाच वक्राकार दरवाज्याच्या सांडव्यावरुन दूधगंगा नदी पात्रात विसर्ग.

----------------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

----------------------------------------------

 दूधगंगानगर तालुका राधानगरी येथील राजर्षी शाहू सागर धरणामध्ये पावसाचा जोर कमी असला तरी धरणाच्या पाच वक्राकार दरवाज्याच्या सांडव्यापर्यंत धरण भरले असून धरणात येणाऱ्या पाण्याचा सांडव्यावरून विसर्ग होत आहे तर पावसाचा जोर वाढल्यास जलविद्युत केंद्रातून दोन हजार क्यूसेस्क विसर्ग दूधगंगा नदीपात्रात होण्याची शक्यता आहे.धरणात २० टी एम सी पाणी साठले आहे.  





  धरणाची पाण्याची पातळी ६४१.०२ मीटर असून पाणीसाठा ५५७.८३८ द ल घ मी इतका झाला (१९.७० टी एम सी) म्हणजे च ७७.५७ टक्के इतका झाला आहे. तर आज धरण परिसरात २४ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून आज अखेर १८६१ मिलिमीटर पाऊस झाला. जलविद्युत प्रकल्प सुरू झाल्यास खुले असलेले वक्राकार दरवाजे बंद करून धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.