Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शिरोली एम आय डी सी तील सेवा रुग्णालयात उपचाराची कमतरता.

 शिरोली एम आय डी सी तील सेवा रुग्णालयात उपचाराची कमतरता.

----------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------

गेल्या वर्षी खासदार संजय मंडलिक साहेब यांच्या पुढाकाराने शिरोली एम आय डी सी,कागल पंचतारांकित एम आय डी सी,गोकुळ शिरगाव एम आय डी सी या ठिकाणी सेवा रुग्णालये सुरू केली. एम आय डी सी तील कामगारांना तात्काळ प्राथमिक उपचार मिळावेत,त्यांना सेवा रुग्णालयातील सुविधांचा लाभ मिळावा,ह्या हेतूने ही रुग्णालये सुरू केली. गेल्या वर्षभरापासून शिरोली एम आय डी सी मध्ये स्मॅक च्या इमारतीमध्ये भाडे तत्वावर हा सेवा दवाखाना सुरू आहे. या ठिकाणी नवीन विमाधारकाची नोंदणी,विमा कार्ड काढणे,क्लेम सादर करणे,प्राथमिक उपचार करणे,औषध गोळ्या देणे या सुविधा या ठिकाणी चालू आहेत. जवळ सेवा दवाखाना चालू झालेने याचा लाभ कामगारांना मिळू लागला.त्यामुळे कामगारांचा कल उपचार घेण्यासाठी या दवाखान्याकडे वाढू लागला. परंतु प्राथमिक उपचार घेण्यासाठी गेल्यानंतर पेशंट कडून आजाराची तोंडी माहिती घेऊन या ठिकाणी फक्त औषध,गोळ्या दिल्या जातात. याठिकाणी  प्राथमिक उपचारा अंतर्गत बीपी,शुगर चेक करणे, इंजेक्शन देने,गरज भासल्यास सलाईन लावणे,हे उपचार येथे होताना दिसत नाहीत.त्यामुळे प्राथमिक उपचार या ठिकाणी पूर्णपणे होत नाहीत,असे निदर्शनास येत आहे.या ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस पदविका घेतलेले आहेत,तरी ही याठिकाणी बाकीचे प्राथमिक उपचार होणे सुद्धा गरजेचे आहे,अशी मागणी कामगार वर्गातून होत आहे. विषेश म्हणजे या ठिकाणच्या स्टाफ हा कंत्राटी पद्धतीवर भरलेला आहे. हा दवाखाना चालू झाल्यापासून एकही वैद्यकीय अधिकारी दोन तीन महिन्याच्यावर टिकत नाही.उपचाराबरोबर या ठिकाणी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे आहे,

Post a Comment

0 Comments