दिव्यांगांना स्टॉल देण्यास न. मुं. म.पा चा विलंब.
दिव्यांगांना स्टॉल देण्यास न. मुं. म.पा चा विलंब.
नवी मुंबई (कोपरखैरणे ):-
2019 च्या सर्वेक्षणानुसार 975 दिव्यांगां चे महानगरपालिकेद्वारे अर्ज स्वीकारण्यात आले होते. त्यापैकी स्थानिक भूमिपुत्र, माजी सैनिक, पिवळे रेशन कार्ड धारक व दिव्यांग असलेल्या केवळ 330 उमेदवारांनाच पात्र ठरवण्यात आले होते. मुळात हे स्टॉल्स दिव्यांगांसाठीच असल्याचे प्रथम सांगण्यात आले होते परंतु वरील चार पैकी तीन बाबींना अधिकचे करून दिव्यांगांबरोबर अन्याय झाल्याचे दिसून येत आहे. पूर्वीचे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्या काळात डिसेंबर 2022 मध्ये स्टॉलचे वाटप करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पुनश्च नवीन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अनुक्रमे 2023 जुलै महिना त्यानंतर परत 15 ऑगस्ट चा मुहूर्त व आता 1 सप्टेंबर ही तारीख दिली आली आहे.
दरम्यान प्राप्त माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते स्टॉल वाटप करण्यात येणार आहे व त्यांना वेळ मिळत नसल्याचे कारण आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याद्वारे लाभार्थींना कळविण्यात आले आहे.
(" पावसाळ्याच्या दिवसात स्टॉलचा पत्रा गंजून खराब झाल्यास पालिका पुनश्च नवीन टेंडर काढून स्टॉलच्या रिपेरिंग चे काम काढते की काय? याशिवाय मुख्यमंत्र्यांना वेळ नाही तर दोन दोन उपमुख्यमंत्री असताना लाभार्थी वंचित का? आजची महागाई पाहता दिव्यांगांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. याचा पालिकेने सखोल विचार करावा व लवकरात लवकर स्टॉलचे वाटप करावे"
------- सतीश गडकरी, दिव्यांग लाभार्थी
Comments
Post a Comment