Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

काळम्मावाडी धरणाच्या गळती प्रतिबंधाच्या कामासाठी सुमारे ८१.३५ कोटी रुपयांचा निधी लागणार .उप अभियंता विजय राठोड.

 काळम्मावाडी धरणाच्या  गळती प्रतिबंधाच्या कामासाठी सुमारे ८१.३५ कोटी रुपयांचा निधी लागणार .उप अभियंता विजय राठोड.

 

  महाराष्ट्रासह कर्नाटक राज्याला जीवनदायी ठरलेल्या राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी येथील दूधगंगा धरणाच्या गळतीचा प्रश्न गंभीर आहे.आज जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी धरणाला भेट दिली यावेळी जलसंपदा विभागाचे अधिकाऱ्यांनी शासन स्तरावर गळती प्रतिबंधाच्या कामासाठी सुमारे ८१.३५ कोटी रुपयांचा निधी मंजुरीसाठी प्रस्तावित आहे.लवकरच निधी मंजूर होऊन कामास सुरवात होणार असल्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी  बोलताना दिली.

  काळम्मावाडी इथले दूधगंगा धरण प्रकल्प हा  ६४६.०० मीटर  २५.४० टीएमसी पाणीसाठवन क्षमता असलेला प्रकल्प असून या धरणाचा बांधकामास सन १९७७ साली सुरुवात झाली होती. तब्बल बावीस वर्षानी  १९९९ साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले असून दुसर्याच वर्षी २००० साली या धरणातून प्रतिसेकंद  ७० लिटर नैसर्गिक गळती मान्य असताना ३९८ लिटर प्रतिसेकंद गळती सुरु झाली होती.ही गळती  ग्राउटिंग करुन काही प्रमाणात कमी करण्यास यश मिळाले होते.  सद्यस्थितीत धरण भरले आहे.धरणातून प्रतिसेकंद १९१ लिटर पाण्याची गळती सुरू असून या पाश्र्वभूमीवर पाटबंधारे विभागातील अधिक्षक अभियंत्यांच्या पथकाने धरण क्षेत्राला भेट देऊन पहाणी केली. याविषयी वरिष्ठ पातळीवर  चर्चा करून तातडीने गळती थांबवण्यासाठी त्वरीत संबंधित यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.शासन स्तरावरती निधीसाठी प्रस्ताव  सादर केला असून निधी मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आलेला असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

  यावेळी उप अभियंता विजय राठोड , सुरज बरागले, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, नेताजी पाटील,  महादेव सावंत, प्रकाश रेवडेकर, राजाराम गायकवाड उपस्तित होते.

Post a Comment

0 Comments