Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

एसटी स्टँड वरील चोरीचा छडा तब्बल दोन लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल शाहूपुरी पोलिसांच्या कडून हस्तगत.

  एसटी स्टँड वरील चोरीचा छडा तब्बल दोन लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल शाहूपुरी पोलिसांच्या कडून हस्तगत.

 

-----------------------------------------------------------------------------

--------------------------------------------------------------------------

एसटी स्टँडवर झालेल्या चोरीचा छडा लावण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले आहे. शाहुपुरी पोलीसानकडुन चोरीचा गुन्हा उघड करीत सोन्याचे 7 तोळे दागिणे एक मोबाईलजप्त करण्यात आलाय.

शाहुपुरी पोलीस ठाणे कोल्हापुर गु.र.नं. 541/2023 भा.द.वी. स कलम 379 प्रमाणे दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात शाहुपुरी पोलीस ठाणेच्या गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे. 

दिनांक 09/05/2023 रोजी दुपारी 15.30 वा चे सुमारास सौ . अश्विनी सतिश खांबे वय -32 रा . इस्लामपुर ता . वाळवा जि . सांगली हया मध्यवर्ती बस स्थानक कोल्हापूर येथे त्यांचा भाऊ सुमित पाटील यांचे सोबत येवून कोल्हापूर इस्लामपुर ( जाणारे बसमध्ये फिर्यादी यांनी सिट पकडण्याकरीता खिडकीतून सोन्याचे दागिने रोख रक्कम व मोबाईल असलेली बॅग आत मध्ये बसचे सिटवरती ठेवली असता कोणीतरी अज्ञात इसमाने बॅग चोरले बाबत गुन्हा नोंद झाला होता . सदर गुन्ह्यचा तपास करत असताना दिनांक 25/09/2023 रोजी शुभम संकपाळ व लखनसिंह पाटील यांना त्याचे गोपणीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक अज्ञात इसम चोरीचा मुददेमाल घेवून स्वामी समर्थ मंदीर , रुईकर कॉलनी , कोल्हापूर येथे येणार असलेची गोपणीय बातमी मिळाली होती . त्या अनुशंगाने शाहुपुरी पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकातील अमंलदार यांनी सापळा लावला असता सदरचा सरांयीत इसम स्वामी समर्थ मंदीर , रुईकर कॉलनी येथे एक इसम संशयीत रित्या फिरताना दिसला त्यावेळी सदर इसमास ताबेत घेवून त्याचा अंगझाडा घेतला असता त्याचे ताबेत सोन्याचे दागिणे , रोख रक्कम व एक मोबाईल मिळून आला त्यावेळी त्याचेकडे चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिले त्यानंतर सदर इसमास विश्वासात घेवून अधिक विचारपुरस केली असता त्याने सदरचे सोन्याचे दागिणे , रोख रक्कम व मोबाईल हा चार महिन्यापुर्वी मध्यवर्ती बस स्थानक कोल्हापूर येथे बस चे खिडकितून हात घालून चोरी केला असलेचे सांगितले त्यांनतर सदर सोन्याचे दागिणे व रोख रक्कम व मोबाईल हा वरील गुन्हयातील असलेचे खात्री झाली नंतर सदर इसमास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव प्रताप विलास बागल वय 50 रा . 2 री गल्ली , उजळाईवाडी , ता . करवीर जि . कोल्हापुर असे सांगीतले . सदर इसमाचे ताबेतून 2,52,000 / - रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे . 1,92,500 / - रु त्यामध्ये सोन्याचे गंठण एक अंदाजे 55 ग्रॅम वजनाचे काळे मणी व तिन पदरी चेन मध्ये असलेले व त्यास लॉकेट असलेले जु . वा . कि . स 35,000 / रु त्यात सोन्याचा गुंड एक अंदाजे 10 ग्रॅम वजनाचा त्या मध्येभागी मोठा मणी व | बाजु , बारीक मणी असलेली जु वा कि स 17,500 / रु त्यात सोन्याचे कानातील टॉप्स जोड एक अंदाजे 5 ग्रॅम वजनाचा मिळून किं . स रु त्यात रेडमी कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट एक सिम कार्ड नसलेला जु वा कि स 3000 / 4000 / रु त्यात लहान पर्स एक व मोठी पर्स एक दोन्ही मध्ये भारतीय चलनातील 100 , 200,500 रुच्या चलनी नोटा मिकिस सदर कारवाई मा . पोलीस अधिक्षक सो महेद्र पंडीत व उप विभागीय पोलीस अधिकारी अजीत टिके यांचे सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सो अजय सिंदकर याचे मार्गदशनाखाली पी . एस . आय प्रमोद चव्हाण सहा . फौजदार संदिप जाधव पोलीस अंमलदार संजय जाधव , मिलीद बांगर , विकास चौगुले शुभम संकपाळ , लखन पाटील , बाबासाहेब ढाकणे , रवी अंबेकर , महेश पाटील यांनी केली आहे .

Post a Comment

0 Comments