Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कोडोली ता. (पन्हाळा )येथे "स्वच्छता ही सेवा 'कचरामुक्त भारत " २०२३ या कार्यक्रमाचे उदघाटन मा. आमदार विनय कोरे (सावकार )यांच्या हस्ते उत्साहात संपन्न.

 कोडोली ता. (पन्हाळा )येथे "स्वच्छता ही सेवा 'कचरामुक्त भारत " २०२३ या कार्यक्रमाचे उदघाटन मा. आमदार विनय कोरे (सावकार )यांच्या हस्ते उत्साहात संपन्न.

कोडोली  येथे "स्वच्छता ही सेवा" २०२३ अंतर्गत "स्वच्छता रन" हा कार्यक्रम कोडोली ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी स्वच्छता रन,स्वच्छता शपथ,महाश्रमदान,प्लास्टिक व्यवस्थापन अंतर्गत ग्रहभेटी,स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार आदी उपक्रम राबविण्यात आले.

यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते ॲड.राजेंद्र पाटील,कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती विशांत महापुरे,सायबर तज्ञ संदिप पाटील,पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती गीतादेवी पाटील,पन्हाळा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर,ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य आलमास मॅडम,सहा.गट विकास अधिकारी मेश्राम साहेब,पन्हाळा पंचायत समिती विस्तार अधिकारी तळपे साहेब,भोसले साहेब,कोडोली गावचे सरपंच भारती पाटील,उपसरपंच प्रविण जाधव,सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामविकास अधिकारी जयवंत चव्हाण-पाटील,गट समन्वयक,समुह समन्वयक,ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments