Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

चंदगड तालुक्यातील नळ पाणीपुरवठा उपअभियंता महिला अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले.

 चंदगड तालुक्यातील नळ पाणीपुरवठा उपअभियंता महिला अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले.

-----------------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------------------

चंदगड येथील ग्रामीण पाणीपुरवठा उप अभियंता सुभद्रा लक्ष्मणराव कांबळे यांना 25 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. सदरच्या कारवाईने चंदगड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारदार हे पोट मक्तेदार (ठेकेदार) असुन त्यानी मुळ ठेकेदार यांनी जलजीवन मिशन योजने अंतर्गत घुलेवाडी ता.चंदगड येथील नळपाणी पुरवठा योजना सुधारीकरण करण्याचे काम घेतले असून तक्रारदार यांनी घुलेवाडी येथे केलेल्या जलजीवन नळपाणी पुरवठा कामाचे बिल मंजूर केले म्हणून आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे मंजूर केलेल्या बारा लाख रुपयाचे तीन टक्के दराने 33,000/-₹ लाचेची मागणी करून तडजोडीअंती 25,000 रुपये लाच रक्कम आरोपी यांनी तक्रारदार यांचेकडून स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी विरुद्ध चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची कारवाई सुरू आहे.


यातील आरोपी या श्रीमती सुभद्रा लक्ष्मणराव कांबळे, पद उप अभियंता, (वर्ग -1) नेमणूक_ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, उपविभाग क्र.9, पंचायत समिती चंदगड,जि. कोल्हापूर सद्या रा.बेळगाव, हनुमान नगर, भक्तीवेस मंगल कार्यालया जवळ,श्री विठ्ठल पाटील यांचे घरी भाड्याने. (बेळगाव) जि.बेळगाव, राज्य कर्नाटक. मूळ पत्ता.सी वन - 506, साकेत पॅराडाईज, आधारवाडी जेल रोड, कल्याण पश्चिम जि. ठाणे येथील रहिवासी आहेत.

सदरची कारवाई सापळा पथक प्रमुख :-श्री सरदार नाळे,(पोलीस उप अधीक्षक)श्री संजीव बंबरगेकर,श्रेणी पोसई,पोहेकॉ / विकास माने,पोहेकॉ / सुनील घोसाळकर पोना/सचिन पाटील ,मपोकॉ/ पुनम पाटील ,चापोहेकॉ / विष्णु गुरव ला.प्र.वि.कोल्हापूर यांनी बजावली आहे.

Post a Comment

0 Comments