Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

नागावमध्ये मोठ्या उत्साहात गणरायाला निरोप.

 नागावमध्ये मोठ्या उत्साहात  गणरायाला निरोप.

----------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------

नागाव,ता. हातकणंगले येथे बुधवार दि 27 सप्टेंबर 2023 रोजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन मोठ्या उत्साहात करण्यात आले. नागावमध्ये 30 ते 35 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत.काही मोजक्याच  मंडळांनी साधेपणाने गणरायाला निरोप दिला.उर्वरित मंडळांनी डॉल्बीच्या दणदणाटात जल्लोषात गणरायाला निरोप देण्यात आला. छत्रपती शिवाजी चौकात ग्रामपंचायत च्या वतीने सर्व गणेशोत्सव मंडळांना पान नारळ सुपारी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.मिरवणूक पाहण्यासाठी महिलावर्ग तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.दिवंगत माजी उपसरपंच राजेंद्र परीट  यांच्या स्मरणार्थ सचिन स्पोर्ट्स यांच्या वतीने गणेशोत्सव मंडळांना गौरव चिन्ह देण्यात आले.तसेच दिवंगत शिवसेना शहर प्रमुख सुनिल सुतार यांच्या स्मरणार्थ क्रांती तरुण मंडळ यांच्या वतीने मंडळांना गौरव चिन्ह देण्यात आले. रात्री ठीक 11 वाजता मिरवणुका बंद करण्यात आल्या.यावेळी शिरोली एम आय डी सी पोलिस ठाणेचे पी आय श्री पंकज गिरी यांच्या मागर्दशनाखाली चोख बंदोबस्त तैनात होता.

Post a Comment

0 Comments