Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राधानगरीतील सिस्टीमचा आवाज बारा वाजता बंद.

 राधानगरीतील सिस्टीमचा आवाज बारा वाजता बंद.

मंडळांनी घालून दिला आदर्श: गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीला अफाट गर्दी.

राधानगरी येथील गणेश विसर्जन मिरवणुकीतील सर्वच मंडळांच्या साउंड सिस्टीमचा आवाज रात्री 12 वाजता बंद झाला. हजारोंच्या संख्येने आलेल्या शौकिनांना नेमके काय झाले कळेना. प्रशासनाच्या आवाहनानुसार मंडळांनी प्रशासनास सहकार्य केले.

आसमंत उजळून टाकणारी रोषणाई, साउंड सिस्टिमवर थिरकणारी तरुणाई, लावणीची दिलखेचक अदाकारी सोबत बॉलिवूडमधील विविध गाण्यांनी विसर्जन मिरवणुकीत रंगत आणली. दुपारी ४ वाजता मुख्य  मिरवणुकीला सुरुवात झाली. यामध्ये शिवाजी तरुण मंडळांनी पारंपरिक वाद्य वाजवत मिरवणूक काढली तसेच शिवशक्ती लंकानी कट्टा तरुण मंडळ, राजर्षी शाहू तरुण मंडळ, श्री साई कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ ,श्री गणेश तरुण मंडळ, श्री सिद्धिविनायक तरुण मंडळ, सह्याद्री तरुण मंडळ, जय हनुमान तालीम, वाघाची तालीम या मंडळांनी  आणलेल्या रशियन बेले, रोषणाई, लावणी नृत्यांगना, ग्रुप डान्सरने तुफान गर्दी खेचली.

राधानगरीतील मिरवणुकीत सुमारे  हजारांवर प्रेक्षकांनी हजेरी लावली. ८ ते रात्री 12 पर्यंत गर्दीने उच्चांक मोडला. तर मिरवणुकीची सांगता नऊ तासानंतर करण्यात आली.

     पोलिसांची फौज मिरवणुकीवर लक्ष  ठेवून होती. राधानगरीचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील यांनी नियोजन केले.

Post a Comment

0 Comments