आझाद हिंद गणेश मंडळाच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न.
आझाद हिंद गणेश मंडळाच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न.
कंथेवाडी ता. राधानगरी येथील हिंदू एकता आंदोलन प्रणित आझाद हिंद गणेश तरुण मंडळाने निपाणी येथील सुजित माने व सहकारी यांच्या वतीने आयोजित केल्या जाणार्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वागत प्रथमेश पाटील यांनी केले तर अनिष पाटील यानी प्रास्ताविक केले. सरपंच सौ. अश्विनी गुरुनाथ चौगले यांनी मनोगत व्यक्त केले.प्रमुख अतिथी मा. सुजित माने म्हणाले , " ग्रामीण भागातील स्ञीयांना मुक्त होण्याचे व्यासपीठ म्हणजे होम मिनिस्टर. या कार्यक्रमातून महिलांना आपल्या अंगी असणार्या कलागुण आणि कौशल्या यांचा आविष्कार करण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाते." या कार्यक्रमात सेहचाळीस महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला सौ. किर्ती प्रशांत पाटील पैठणीची मानकरी ठरली. सौ. रुपाली प्रदिप कवडे यांनी द्बितीय क्रमांक पटकविला तृतीय क्रमांक सौ.दिव्या अभिजित सुतार यांना मिळाला सौ.अमृता प्रशांत निकम यांनी चतुर्थ क्रमांक तर सौ. सरिता रविंद्र पाटील यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला अमित पाटील आणि सहकार्यांच्या मदतीने कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते. शिवराय समूहाचे संस्थापकअध्यक्ष मा. एकनाथराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.या मंडळाने गेली ३८ वर्षे सामाजिक उपक्रमातून समाज प्रबोधनाचा वसा जोपासला आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम ,प्रबोधनपर देखावे,शाहिरी स्पर्धा ज्ञानेश्वरी पारायण या प्रकारचे कार्यक्रम अयोजित केले जातात. स्थापनेनंतर सुरुवातीची पंचवीस वर्षे एक गाव एक गणपती उपक्रम राबविल्याने मंडळाला गणराया पुरस्काने सन्मानित केले गेले
१९८५ साली सार्वजनिक गणशोत्सव साजरा करण्याच्या हेतूने मंडळाची स्थापना हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या विचारातून केली. या वर्षी मंडळाच्या अध्यक्षपदी आदर्श पाटील,उपाध्यक्ष अक्षय पाटील, खजानीसपदी आबाजी भोसले कार्यरत आहेत. अखंड अडतीस वर्षे रामचंद्र भोपळे गणेश उत्सव काळात पुजाअर्चा करतात. या वर्षीची श्री ची मूर्ती आणि महाप्रसाद देणगीदार मुंबई पोलीस विनायक पाटील यांनी दिली आहे, मंगळवार ता.२६ रोजी संध्याकाळी ह.भ.प आनंदराव पाटील मळगेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून हणूमान भजनी मंडळ यांची भजनी साथ मिळणार आहे.दि २७ रोजी महाप्रसाद नियोजन केले आहे.
Comments
Post a Comment